मनू भाकर पॅरिस ऑलिम्पिक समारोप समारंभात भारताची ध्वजवाहक बनणार

Paris Olympic 2024 : पुरुष ध्वजवाहक अद्याप निश्चित नाही
Paris Olympic 2024, Manu Bhakar
मनू भाकर  पॅरिस ऑलिम्पिक समारोप समारंभात भारताची ध्वजवाहक बनणारPudhari Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पॅरिस ऑलिम्‍पिकमध्‍ये (Paris Olympic 2024) आपल्‍या अव्‍दितीय कामगिरीच्‍या जोरावर इतिहास घडविणारी भारताची युवा नेमबाज मनू भाकर (Manu Bhaker) पॅरिस ऑलिम्पिकच्या समारोप समारंभात भारताची ध्वजवाहक बनणार आहे.

भारताचा पुरुष ध्वजवाहक अद्याप निश्चित नाही 

रेकॉर्ड गर्ल मनू भाकरने शनिवारी (दि. ३) पदकांच्‍या हॅटट्रिकने हुलकावणी दिली. 25 मीटर एअर पिस्‍तुल प्रकारात तिला चाैथ्‍या स्‍थानावर मानावे लागले समाधान लागले. दरम्यान भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA-Indian Olympic Associatio) च्या सूत्रांनी सांगितले की पॅरिस ऑलिम्‍पिक समारोप संमारंभात मनू भाकर भारताची महिला ध्वजवाहक असेल. या समारंभासाठी भारताचा पुरुष ध्वजवाहक अद्याप निश्चित झालेला नाही. 

Paris Olympic 2024
मनू भाकर पॅरिस ऑलिम्पिक समारोप समारंभात भारताची ध्वजवाहक बनणार X (Twitter)

मनू भाकरच्‍या नावावर 'विक्रमांची मांदियाळी'

  • मनू भाकर ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे.

  • एकाच ऑलिम्पिक स्‍पर्धेत दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.

  • दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारा पहिला भारतीय नेमबाज ठरण्‍याचा विक्रमही तिच्‍या नावावर नोंदला गेला आहे.

  • ऑलिम्पिकमध्ये सांघिक पदक जिंकणारी मनु भाकर आणि सरबज्योत सिंग ही पहिली भारतीय नेमबाज जोडी ठरली.

  • वैयक्तिक आणि सांघिक दोन्ही प्रकारात ऑलिम्पिक पदक जिंकणारी मनू भाकर पहिली नेमबाज ठरली आहे.

  • एकाच ऑलिम्पिकमध्ये तीन स्पर्धांची अंतिम फेरी गाठणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.

Paris Olympic 2024
मनू भाकरच्‍या नावावर 'विक्रमांची मांदियाळी' X (Twitter)

पॅरीस ऑलिम्‍पिकमध्‍ये मनू भाकरने घडवला इतिहास

पॅरीस आलिम्‍पिकमध्‍ये मनू भाकरने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. तिने प्रथम 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्‍य पदक पटकावले. यानंतर 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात सरबज्योत सिंग याच्‍यासोबत दुसर्‍या कांस्‍य पदकाला गवसणी घातली. एकाच ऑलिम्‍पिकमध्‍ये दोन पदके पटकवणारी ती देशातील पहिली खेळाडू ठरली आहे.

Paris Olympic 2024, Manu Bhakar
Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एका आईची तलवारबाजी...

पॅरिस ऑलिम्‍पिक समारोप सोहळा 'या' दिवशी

क्रीडाविश्वातील सर्वांत मोठ्या आणि प्रतिष्ठेच्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा यंदा फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे होत आहेत. यंदा ऑलिम्पिकच्या 128 वर्षांच्या इतिहासात प्रथमच एखाद्या स्टेडियमऐवजी सीना नदीवर उद्घाटन सोहळ्याचे आयोजन केले होते. (Paris 2024 Olympics) १८ दिवस चालणाऱ्या या स्पर्धाेचा समारोप ११ ऑगस्ट रोजी होणार आहे. 

ऑलिम्पिक २०२८ कोठे सुरू होईल?

ऑलिम्पिक खेळ दर चार वर्षांनी एकदा होतात, ज्यात जगभरातील खेळाडू एकत्र येत असतात. यंदा ऑलिम्पिक २०२४ फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे होत आहेत. तर २०२८ साली ऑलिम्पिक खेळ लॉस एंजेलिस मध्ये होणार आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news