Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एका आईची तलवारबाजी...

नदा हाफेझने जिंकली मने !
Olympics 2024
एका आईची तलवारबाजीFile Photo
Published on
Updated on

पॅरिस : वृत्तसंस्था

संघर्षावर मात करत प्रतिकूल परिस्थितीतही बाजी मारणाऱ्या इजिप्तच्या एका महिला फेन्सरने अवघ्या क्रीडा विश्वाला आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इजिप्तची नदा हाफेझ ही महिला ऑलिम्पियन (Olympics 2024 ) सात महिन्यांची गर्भवती असून तरीही तिने अतिशय धाडसाने यंदाच्या स्पर्धेत उतरण्याचा निर्णय घेतला. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये तिचे आव्हान गटात संपुष्टात आले असले तरी तिची जिद्द मात्र वाखाणण्याजोगी ठरली आहे.

पॅरिस आऑलिम्पिकमध्ये सर्वांचेच लक्ष वेधून घेणारी नदा सात महिन्यांची गर्भवती आहे. आपल्या पोटातल्या बाळासह तिने ऑलिम्पिकमध्ये सुरुवातीच्या स्पर्धांमध्ये विजयी सलामीही दिली आणि अंतिम १६ स्पर्धकांमध्ये स्थान मिळवले. विशेष म्हणजे तिची लढत झाल्यानंतर तिने सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमधून आपण गर्भवती असल्याचे जाहीर केले आणि अर्थातच हा सर्वांसाठी धक्का होता. स्पर्धेतून बाहेर पडण्यापूर्वी तिने अमेरिकच्या एलिझाबेथ तार्ताकोव्हस्कीला १५-१३ अशा फरकाने पराभूत केले.

नदा स्पर्धेतून ती जरी बाहेर पडली असली तरी तिने फक्त पॅरिसवासीयांचीच नाही तर जगभरातल्या प्रेक्षकांची मने जिंकली. आपल्या खेळावर तिची प्रचंड निष्ठा आहे हे तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलेल्या संदेशातूनच अधोरेखित होते. ती आपल्या पोस्टमध्ये म्हणते, 'माझ्या गर्भात भविष्यातला एक छोटा ऑलिम्पिक खेळाडू वाढतोय आणि मी या स्पर्धेत उतरत असताना त्याचीही काळजी घेत आले आहे. आयुष्य आणि खेळ यांच्यात समतोल राखणे अतिशय आव्हानात्मक होते आणि हे करत असताना शेवटच्या १६ खेळाडूंमध्ये पोहोचता आले, याचे मला समाधान आहे.'

महिलांसाठी तलवारबाजी अधिक आव्हानात्मक, तरीही...

नदा हाफेझ ही इजिप्तची राजधानी कैरोमधली रहिवासी आहे. तिने यापूर्वर्वीदेखील दोन ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला. यंदा तिच्यासाठी ही तिसरी ऑलिम्पिक आहे. तलवारबाजीत उतरण्यापूर्वी नदालने जिम्नॅस्टिक्समध्ये चुणूक दाखवली आहे. शिवाय, तिने वैद्यकीय क्षेत्रात शिक्षणही घेतले आहे.

तलवारबाजीला प्रचंड शारीरिक क्षमता लागते. त्यामध्ये वेग, रणनीती, ताकद असे सारे काही आवश्यक असते. त्यातूनही महिलांसाठी तलवारबाजी अधिक आव्हानात्मक असते. यानंतरही नदाने स्पर्धेत भाग घेणे कौतुकाचे ठरते आहे. नदा २०१४ सालापासून तलवारबाजी शिकत आहे. तिच्या मैत्रिणीकडे पाहून ती या खेळाकडे वळली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news