Pakistan vs England : पराभवाचे साईड इफेक्ट्स..! इंग्लंडविरुद्धच्या दारुण पराभवानंतर PCB ने ६ खेळाडूंना इंग्लंडला बोलावले

सलग दोन सामन्यांतील पराभवानंतर व्यवस्थापनाला आली जाग
Pakistan vs England Test Series :
बाबर आझमसोबत सरफराज अहमद.
Published on
Updated on

Pakistan vs England Test Series : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत झालेल्या लाजीरवाण्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) तातडीने मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील अंतिम कसोटीपूर्वी पाकिस्तान संघात मोठे फेरबदल केले जात आहेत.

सलग दोन सामन्यांतील पराभवानंतर आली जाग

मालिकेतील पहिले दोन्ही सामने गमावल्यानंतर पाकिस्तान बोर्डाने बदलांचे पर्व सुरू केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एजबॅस्टन येथील तिसऱ्या कसोटीपूर्वी पांढऱ्या चेंडूचे (मर्यादित षटकांचे) मुख्य प्रशिक्षक मायक हेसन यांच्याकडे कसोटी संघाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता आहे. याशिवाय, पाकिस्तानमधून तब्बल सहा खेळाडूंना तातडीने इंग्लंडला बोलावण्यात आले आहे.

Pakistan vs England Test Series :
Mohammad Amir British Citizenship : "माझ्यासाठी पाकिस्तानचा अध्याय संपला" : क्रिकेटपटू मोहम्‍मद आमीर आता 'ब्रिटिश नागरिक'

मोहम्मद रिझवानला मायदेशी पाठवले जाणार

खराब फॉर्ममुळे मोहम्मद रिझवानला मायदेशी परत पाठवले जात असून, पायाच्या दुखापतीमुळे इमाम-उल-हक देखील मायदेशी परतण्याची शक्यता आहे. इंग्लंडला बोलावण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये सॅम अयुब आणि अराफत मिन्हास यांचा समावेश असून, व्हिसा मिळताच उर्वरित खेळाडू संघात रुजू होतील.

Pakistan vs England Test Series :
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीची 'विक्रमी' घोडदौड सुरूच; दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत मोडला सर्वकालीन विक्रम

गोलंदाजांसमोर फलंदाजांचे समर्पण

इंग्लंडने दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये पाकिस्तानचा एकतर्फी पराभव केला. हेडिंग्ले येथील पहिल्या कसोटीत इंग्लंडने एक डाव आणि १०३ धावांनी विजय मिळवला, तर लॉर्ड्सवरील दुसऱ्या कसोटीत १९४ धावांनी विजय मिळवत मालिका २-० अशी खिशात घातली. लॉर्ड्स कसोटीत ओली रॉबिन्सन, जोश टंग आणि जोफ्रा आर्चर यांच्या स्विंग व वेगवान मारासमोर पाकिस्तानचा पहिला डाव अवघ्या ११० धावांत, तर दुसरा डाव १९४ धावांत गुंडाळला गेला.

Pakistan vs England Test Series :
Novak Djokovic US Open Upset : २५व्या ग्रँडस्लॅमची पुन्हा हुलकावणी! नोव्हाक जोकोविच 'यूएस ओपन'च्‍या पहिल्याच फेरीत पराभूत

प्रशिक्षक आणि व्यवस्थापनातही होणार खांदेपालट

अंतिम कसोटीसाठी कोचिंग स्टाफमध्ये बदल केला जात आहे. मायक हेसन हे एजबॅस्टन कसोटीत मुख्य प्रशिक्षकाची भूमिका पार पाडतील. सरफराज अहमद संघासोबत राहणार असला तरी त्याच्या प्रशिक्षकपदावर टांगती तलवार आहे. मात्र, पीसीबीने अद्याप याची अधिकृत घोषणा केलेली नाही.

पीसीबी अध्यक्षही इंग्लंडमध्ये बैठकीसाठी उपस्थित राहणार

लॉर्ड्स कसोटीतील पराभवापूर्वीच हेसन आणि हाय-परफॉर्मन्स डायरेक्टर आकिब जावेद लंडनमध्ये दाखल झाले होते. २ सप्टेंबर रोजी किंग चार्ल्स यांनी पाकिस्तान संघासाठी आयोजित केलेल्या स्नेहभोजनासाठी हे अधिकारी तेथे गेल्याचे सांगण्यात आले. याशिवाय पीसीबी अध्यक्ष मोहसीन नक्वी, समैर अहमद आणि सलमान नसीर हेदेखील १ सप्टेंबरच्या पीएसएल (PSL) बैठकीसाठी लंडनमध्ये उपस्थित राहणार आहेत.

Pakistan vs England Test Series :
Bilawal Bhutto Marriage Rumors : युरोपच्या राजकुमारीशी लग्नबंधनात अडकणार बिलावल भुट्टो? PPP ने सांगितले वस्‍तुस्‍थिती

पीसीबीतील घडामोडींवर क्रिकेट वर्तुळात जोरदार टीका

मालिकेत लाजीरवाणा पराभव होत असताना पीसीबीच्या अधिकाऱ्यांची लंडन धाव आणि चाललेली लगीनघाई यावर पाकिस्तान क्रिकेट वर्तुळातून जोरदार टीका होत आहे. ९ सप्टेंबरपासून एजबॅस्टन येथे सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीपूर्वी स्वतःला सावरण्यासाठी आता पाकिस्तान संघाकडे अवघ्या आठवड्याभराचा वेळ उरला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news