PAK vs NED : पाकिस्तान आज नेदरलँडशी भिडणार

PAK vs NED : पाकिस्तान आज नेदरलँडशी भिडणार
Published on
Updated on

हैदराबाद; वृत्तसंस्था :  विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा दुसरा सामना पाकिस्तान आणि नेदरलँडस् यांच्यात आज (शुक्रवारी) रंगणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा विश्वचषकातील पहिलाच सामना होणार आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाला दोन्ही सराव सामन्यांत सपाटून मार खावा लागला आहे, तर नेदरलँडस्चे सराव सामने पावसामुळे रद्द झाले होते; परंतु पात्रता फेरीत त्यांनी दोनवेळेचा विश्वविजेता वेस्ट इंडिज संघाला मागे टाकून मुख्य फेरीची पात्रता मिळवली असल्याने त्यांच्याकडून चांगल्या लढतीची अपेक्षा आहे. (PAK vs NED)

हवामानाचा अंदाज

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार हैदराबादमध्ये शुक्रवारी पावसाची शक्यता नाही. दिवसाचे कमाल तापमान 33 डिग्री सेल्सियस तर किमान तापमान 25 डिग्री सेल्सियस राहील, पण त्याचबरोबर काही वेळ आकाश ढगाळ राहील. विशेष म्हणजे सायंकाळी येथे दव पडणार नसल्याने प्रथम फलंदाजी करणार्‍या संघासाठी ही चांगली गोष्ट असणार आहे. (PAK vs NED)

आजचा सामना

पाकिस्तान वि. नेदरलँडस्

वेळ ः दु. 2.00 वा. स्थळ : हैदराबाद.
प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस् नेटवर्क (PAK vs NED) 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news