PAK vs ENG : इंग्लंडने केली पाक गोलंदाजांची धुलाई

PAK vs ENG : इंग्लंडने केली पाक गोलंदाजांची धुलाई

लाहोर, वृत्तसंस्था : पाकिस्तान आणि इंग्लंड (PAK vs ENG) यांच्यातील लाहोर येेथे झालेल्या टी-20 सामन्यात इंग्लंडच्या फिल सॉल्टने पाकिस्तानी गोलंदाजांची अक्षरश: धुलाई केली. त्याने 41 चेंडूंत केलेल्या 87 धावांच्या जोरावर इंग्लंडने सहाव्या सामन्यात पाकिस्तानवर 8 विकेटस्नी मात केली. या विजयाबरोबर ही मालिका 3-3 अशी बरोबरीत सुटली.

टी-20 मालिकेतील (PAK vs ENG) सहावी मॅच लाहोर येथे झाली. इंग्लंडचा कर्णधार मोईन अलीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानने दिलेल्या विजयाचे लक्ष्य इंग्लंडने 8 विकेट आणि 33 चेंडू राखून पार केले. पाकिस्तानला कर्णधार बाबर आझमची खेळी महागात पडली. सहाव्या टी-20 सामन्यात पाकिस्तानने मोहम्मद रिझवानला विश्रांती दिली होती. त्याच्या जागी मोहम्मद हारिसला स्थान देण्यात आले होते. पण तो फक्त 7 धावा करू शकला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 6 बाद 169 अशी धावसंख्या उभी केली. आझमने 87 धावा केल्या; पण त्यासाठी 59 चेंडू घेतले. 20 षटके फलंदाजी करून त्याला फक्त 7 चौकार आणि 3 षटकार मारता आले.

विजयासाठी 170 धावांचे टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या फलंदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांची बेदम धुलाई केली. एलेक्स हेल्स आणि फिलिप सॉल्ट यांनी फक्त 23 चेंडूंत 55 धावांची भागीदारी केली. हेल्स 12 चेंडूंत 27 धावा करून बाद झाला. इंग्लंडने पॉवर प्लेमध्येच 82 धावा केल्या आणि 15व्या षटकात मॅच देखील जिंकली. सॉल्टने 41 चेंडूत 13 चौकार आणि 3 षटकारांसह 87 धावा केल्या. तर डेव्हिड मलानने 18 चेंडूत 26 धावा आणि बेन डकलेटने 16 चेंडूत 26 धावा केल्या.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news