Olympic Games Paris 2024 : पॅरिस ऑलिम्पिकवर कोरोनाचे सावट! दोन खेळाडू 'पॉझिटिव्ह'

ऑस्ट्रेलियाच्या दोन महिला खेळाडूंना कोरोना
 Olympic Games Paris 2024
ऑलिम्पिकसाठी पॅरिसमध्ये आलेल्या ऑस्ट्रेलियन संघातील दोन महिला खेळाडूंना कोरोना लागण झाली आहे. Olympic Games Paris 2024 File Photo

पुढारी ऑनलाईन डेस्क | Olympic Games Paris 2024 : क्रीडाप्रेमी अगदी आतुरतेने पॅरिस ऑलिम्पिकची वाट पाहत आहेत. पॅरिस ऑलिम्पिक 2024 सुरू होण्यास अवघे काहीच दिवस शिल्लक आहेत. अशातच पॅरिसमधून सर्वांना धडकी भरवणारी माहिती समोर येत आहे. ऑलिम्पिकसाठी पॅरिसमध्ये आलेल्या ऑस्ट्रेलियन संघातील दोन महिला खेळाडूंना कोरोना लागण झाली आहे. या खेळाडू वॉटर पोलो या क्रीडा प्रकारात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करतात. पॅरिस ऑलिम्पिक 26 जुलैपासून सुरू होणार आहे.

 Olympic Games Paris 2024
MCA President Election: अजिंक्य नाईक एमसीएचे नवे अध्यक्ष, आशिष शेलारांच्या उमेदवाराचा पराभव

ऑस्ट्रेलियाच्या ऑलिम्पिक संघाचे प्रमुख ॲना मेयर्स म्हणाल्या की, या घटनेमुळे आम्हाला ही धक्का बसला आहे. खबरदारी म्हणून संघातील सहकारी खेळाडू मास्क घालतील आणि सामाजिक अंतराचे नियम पाळतील. त्याच्या सर्व साथीदारांचीही चाचणी घेण्यात आली आहे. कोरोनाबाधित खेळाडूमध्ये अनेक लक्षणे होती. चांगली गोष्ट म्हणजे आमच्या संघाकडे स्वतःची चाचणी उपकरणे होती जेणेकरून कोरोणाचे निदाना करता आले.

 Olympic Games Paris 2024
Budget 2024 : सर्वांगीण विकासाचा अर्थसंकल्प : डॉ. आशिष देशमुख

ऑस्ट्रेलियन ऑलिम्पिक समितीने सांगितले की, त्याच्या जवळच्या संपर्कात आलेल्या दुसऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यामुळे सध्या कोरोना पॉझिटिव्ह खेळाडूंची संख्या दोनवर पोहचली आहे. कोविड-पॉझिटिव्ह असलेल्या खेळाडूने कालच्या सत्रात सहकाऱ्यांसोबत सराव केलेला नाही. समिती मार्फत दोघांची नावे उघड करण्यात आली नाहीत.

 Olympic Games Paris 2024
Mutual funds : म्युच्युअल फंडावर कर्ज घेताय? जाणून घ्या अधिक

Olympic Games Paris 2024 : काळजी करण्याचे कारण नाही

त्याचवेळी, फ्रान्स सरकार आणि जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की, देशात कोविड प्रकरणांमध्ये थोडीशी वाढ झाली आहे. आरोग्य मंत्री फ्रेडरिक व्हॅलेटॉक्स म्हणाले की, अद्याप काळजी करण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली नाही. याआधी 2020, 2021, 2022 मध्ये जी कोरोनीची लाट उसळली होती. त्यापासून आपण दूर आहोत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news