

अनेकांना वाटतं की क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम फक्त सचिन तेंडुलकर यांच्या नावावर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांचा 100 शतकांचा विक्रम आहे. मात्र प्रत्यक्षात सर्वाधिक शतकांचा जागतिक विक्रम इंग्लंडच्या दिग्गज फलंदाज सर जॅक हॉब्स यांच्या नावावर आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्यांनी तब्बल 199 शतके ठोकत हा विक्रम केला आहे, जो आजही कुणालाच मोडता आलेला नाही.
हा विक्रम आंतरराष्ट्रीय सामन्यांत नसला, तरी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये शतकांची संख्या पाहता हॉब्स हे सचिन तेंडुलकर यांपेक्षा खूपच पुढे आहेत.
त्यांनी आपल्या कारकिर्दीत—
199 शतके
273 अर्धशतके
अशा अविश्वसनीय विक्रम केला आहे.
फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 834 सामने खेळताना हॉब्स यांनी एकूण 61,760 धावा केल्या. 50.70 अशी त्यांची सरासरी होती. त्यांनी 1 जानेवारी 1908 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
जॅक हॉब्स हे तब्बल 23 वर्षे क्रिकेट खेळले. त्यांचा शेवटचा सामना ऑगस्ट 1930 मध्येही ऑस्ट्रेलियाविरुद्ध झाला. 1953 मध्ये त्यांना नाइटहूड बहाल करण्यात आला. हा सन्मान मिळवणारे ते जगातील पहिले क्रिकेटपटू ठरले.
त्यांनी 1905 मध्ये फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि जवळपास तीन दशके (1934 पर्यंत) ते खेळत राहिले.
त्यांच्या कारकिर्दीतील—
एकूण धावा: 61,760
शतके: 199
क्रिकेट इतिहासातील विक्रम
फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये शतकांच्या बाबतीत सचिन तेंडुलकर हॉब्स यांच्या खूप मागे आहेत.
सचिन यांच्या नावावर—
310 सामने
25,396 धावा (सरासरी 57.84)
81 शतके
116 अर्धशतके
इतकी दमदार कामगिरी असली, तरी हॉब्स यांनी गाठलेला 199 शतकांचा डोंगर आजही भक्कम उभा आहे. हॉब्स यांनी 46 व्या वर्षी ठोकलेले टेस्ट शतक आजही कोणालाच मोडता आलेले नाही. त्यांनी 61 कसोटी सामन्यांत 5,410 धावा, 15 शतके आणि 28 अर्धशतके केली.