BCCI Strict Action : ‘वर्कलोड’च्या नावाखाली मनमानी नको! ‘बीसीसीआय’चा खेळाडूंना सज्जड दम

भारतीय क्रिकेटमधील ‘स्टार संस्कृती’ला नवे प्रशिक्षक गंभीर आणि निवड समितीचे अध्यक्ष आगरकर यांनी सुरुंग लावण्यास सुरुवात केली आहे.
no misuse in the name of workload bcci issues strict warning to players
Published on
Updated on

no misuse in the name of workload bcci issues strict warning to players

भारतीय क्रिकेटमधील ‘स्टार संस्कृती’ला नवे प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी सुरुंग लावण्यास सुरुवात केली आहे. ‘वर्कलोड मॅनेजमेंट’च्या नावाखाली महत्त्वाच्या मालिकांमधून माघार घेणार्‍या खेळाडूंची मनमानी आता खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश ‘बीसीसीआय’ने दिला आहे. इंग्लंड दौर्‍यात मोहम्मद सिराजने दाखवलेल्या अविश्वसनीय तंदुरुस्ती आणि कामगिरीमुळे व्यवस्थापनाचे हात बळकट झाले आहेत.

no misuse in the name of workload bcci issues strict warning to players
Suryakumar Yadav comeback : सूर्यकुमार यादवची दमदार वापसी, नेटमध्ये सरावाला सुरुवात

इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत सिराजने तब्बल 185.3 षटके टाकली. त्याची ही अथक मेहनत आता संघातील इतर खेळाडूंसाठी एक मापदंड बनली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘बीसीसीआय’चे पदाधिकारी, प्रशिक्षक गंभीर आणि निवड समितीत ‘वर्कलोड’च्या नावाखाली होणार्‍या खेळाडूंच्या मनमानी कारभाराला चाप लावण्यावर एकमत झाले आहे.

no misuse in the name of workload bcci issues strict warning to players
Cricket Records : ओव्हल कसोटी विजयाचा ‘हैदराबादी’ योगायोग!, १९७१ मध्ये विजयी धाव.. २०२५ मध्ये अखेरचा बळी

‘बीसीसीआय’चा कठोर पवित्रा

एका वरिष्ठ ‘बीसीसीआय’ अधिकार्‍याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, केंद्रीय करारामध्ये असलेल्या सर्व खेळाडूंना, विशेषतः तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणार्‍यांना आता सामने निवडण्याची मुभा दिली जाणार नाही. ताणतणावाचे व्यवस्थापन महत्त्वाचे आहेच; पण त्याच्या नावाखाली महत्त्वाचे सामने चुकवणे स्वीकारले जाणार नाही.

no misuse in the name of workload bcci issues strict warning to players
Sunil Gavaskar on Workload Management : गावस्करांनी खेळाडूंना खडसावले, म्हणाले; ‘वर्कलोड हे फक्त डोक्यातलं खूळ, मैदानात..’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news