New Zealand vs South Africa : मालिका बरोबरीत सोडवून दक्षिण आफ्रिका ९० वर्षानंतरही अजेय

New Zealand vs South Africa : मालिका बरोबरीत सोडवून दक्षिण आफ्रिका ९० वर्षानंतरही अजेय

क्राइस्टचर्च; पुढारी ऑनलाईन : दक्षिण आफ्रिकेने ( New Zealand vs South Africa ) क्राइस्टचर्च येथे खेळवला गेलेला दुसरा कसोटी सामना न्यूझीलंड विरुद्ध १९८ धावांनी जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने चमकदार कामगिरी करत विजय मिळवला. ही कसोटी मालिका अनिर्णीत संपली असली तरी दक्षिण आफ्रिकेच्यासंघाने आपला अजेय राहण्याचा विक्रम कायम ठेवला आहे.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडविरुद्ध ( New Zealand vs South Africa ) एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. या मालिकेतील पहिली कसोटी गमावल्यानंतर न्यूझीलंडला इतिहास रचण्याची संधी होती, मात्र दुसऱ्या कसोटीत आफ्रिकन फलंदाज आणि गोलंदाजांनी प्रभावी खेळ दाखवत सामना जिंकला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने १९ वर्षे अजिंक्य राहण्याचा विक्रम कायम ठेवला आहे. आतापर्यंत, दोन्ही संघांमध्ये (घरात आणि घराच्याबाहेर) एकूण 17 मालिका खेळल्या गेल्या आहेत, ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने 13 मालिका जिंकल्या आहेत आणि 4 कसोटी मालिका अनिर्णित राहिल्या आहेत.

दोन्ही संघांमधील मालिकेदरम्यान एकूण 47 कसोटी सामने खेळले गेले, ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने 26 कसोटी सामने जिंकले आणि किवी संघाने 5 कसोटी सामने जिंकले. तर 16 कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत.

पहिला कसोटी सामना 1931-32 मध्ये खेळला गेला ( New Zealand vs South Africa )

दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिली कसोटी मालिका 1931/32 मध्ये खेळवली गेली. जेव्हा आफ्रिकन संघ न्यूझीलंडमध्ये आला होता. यादरम्यान दक्षिण आफ्रिकेने २ कसोटी सामन्यांची मालिका २-० ने जिंकली. यानंतर, 1952/53 मध्ये दोन्ही देशांदरम्यान एक कसोटी मालिका खेळली गेली, जी न्यूझीलंडच्या भूमीवर खेळली गेली, ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने 2-कसोटींच्या मालिकेत 1-0 ने विजय मिळवला. त्याच वर्षी न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला आणि पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळले गेले ज्यामध्ये आफ्रिकेने 4 – 0 ने विजय मिळविला.

2022 पूर्वी दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यातील शेवटची कसोटी मालिका 2016/17 मध्ये खेळवली गेली होती. जी न्यूझीलंडमध्येच खेळली गेली होती, या 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने 1-0 विजय मिळवला होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news