

वेलिंग्टन : भारतात पुढील महिन्यात होणाऱ्या वन डे आणि टी-20 मालिकेसाठी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने आपले संघ जाहीर केले असून टी-20 संघाचे नेतृत्व अष्टपैलू मिचेल सँटेनरकडे तर वन डे संघाचे नेतृत्व मायकेल ब्रेसवेलकडे सोपवले गेले आहे. न्यूझीलंडचे प्रमुख खेळाडू केन विल्यम्सन, जेकब डफी आणि रचिन रवींद्र दुखापतीमुळे खेळू शकणार नाहीत.
वेगवान गोलंदाज काईल जेमिसन दुखापतीतून सावरल्यानंतर दोन्ही संघांत पुनरागमन करत आहे. तसेच, मार्क चॅपमन आणि मॅट हेन्री टी-20 संघात परतले आहेत. डावखुरा फिरकीपटू जेडन लेनोक्सला प्रथमच आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर, ख्रिश्चन क्लार्क हा आणखी एक नवा चेहरा एकदिवसीय संघात समाविष्ट करण्यात आला आहे. न्यूझीलंडचा संघ भारतात 3 वन डे आणि 5 टी-20 सामने खेळणार आहे.
या दौऱ्यातील वन डे मालिका 11 जानेवारीपासून तर पाच सामन्यांची टी-20 मालिका 21 जानेवारीपासून येथे सुरू होईल. भारत व श्रीलंकेत फेब्रुवारी 2026 मध्ये होणाऱ्या आगामी आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर ही मालिका दोन्ही संघांसाठी विशेष महत्त्वाची मानली जात आहे.
11 जानेवारी : पहिली वन डे : दु. 1.30 वा. : बडोदा
14 जानेवारी : दुसरी वन डे : दु. 1.30 वा. : राजकोट
18 जानेवारी : तिसरी वन डे : दु. 1.30 वा. : इंदोर
21 जानेवारी : पहिली टी-20 : सायं. 7 वा. : नागपूर
23 जानेवारी : दुसरी टी-20 : सायं. 7 वा. : रायपूर
25 जानेवारी : तिसरी टी-20 : सायं. 7 वा. : गुवाहाटी
28 जानेवारी : चौथी टी-20 / सायं. 7 वा. : विशाखापट्टणम
31 जानेवारी : पाचवी टी-20 : सायं. 7 वा. : तिरुअनंतपूरम
मिचेल सँटेनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे (यष्टिरक्षक), जेकब डफी, झॅक फॉल्क्स, मॅट हेन्री, काईल जेमीसन, बेव्हॉन जेकब्स, डॅरिल मिचेल, जेम्स नीशाम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, टीम रॉबिन्सन, ईश सोधी.
मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), आदित्य अशोक, ख्रिश्चन क्लार्क, जोश क्लार्कसन, डेव्हॉन कॉनवे, झॅक फॉल्क्स, मिच हे (यष्टिरक्षक), काईल जेमीसन, निक केली, जेडन लेनोक्स, डॅरिल मिचेल, हेन्री निकोल्स, ग्लेन फिलिप्स, मायकेल रे, विल यंग.