MS Dhoni | 'तू आता है सीने में' - कॅप्टन कुलची अपूर्ण प्रेमकथा

भारताचा सर्वांत यशस्वी कर्णधार धोनीचा आज वाढदिवस
ms dhoni unfinished love story
महेंद्र सिंग धोनीचे पहिले प्रेम म्हणजे प्रियांका झा. File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा सर्वांत यशस्वी कर्णधार, सर्वोत्तम फिनिशर महेंद्र सिंग धोनी याचा आज वाढदिवस आहे. भारतीय क्रिकेटला सर्वोच्च शिखरावर नेणाऱ्या धोनीच्या क्रिकेट कारकिर्दीवर बरेच लिहिले आहे. पण त्याच्या खासगी जीवनाबद्दल मात्र फारशी चर्चा होताना दिसत नाही. धोनीच्या जीवनातील एक अलवार वळण म्हणजे त्याची पहिली गर्लफ्रेंड प्रियांका झा. स्वतः धोनीने तिच्याबद्दल कधीच वाच्यता केलेली नाही, पण महेंद्र सिंग धोनी या सिनेमात मात्र प्रियांका झा हे पात्र चांगल्या पैकी खुलवण्यात आले आहे.

या घटना २००२च्या आहेत. या वेळी महेंद्र सिंग धोनी भारतीय संघात स्थान निर्माण करण्यासाठी धडपडत होता. या वेळी धोनी आणि प्रियांका झा एकमेकांच्या प्रेमात पडले होते. दोघेही त्यांच्या नात्याबद्दल अतिशय गंभीर होते आणि त्यांना लग्नही करायचे होते. प्रियांका आणि धोनीची ही प्रेमकथा महेंद्र सिंग धोनी - द अनटोल्ड स्टोरी या सिनेमात फार हळूवाररीत्या उलगडून दाखवण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे या सिनेमाच्या कथेत प्रियांकालाही स्थान असले पाहिजे, याला धोनीने मान्यता दिलेली होती.

ms dhoni unfinished love story
MS Dhoni : चेन्नईच्या मैदानात धोनी झाला भावुक

प्रियांका झा हिचा अपघाती मृत्यू

२००३ - २००४ मध्ये धोनीची निवड भारताच्या अ संघात झालेली होती. या काळात धोनी आणि प्रियांका यांच्या नात्यात अल्पसा खंड पडला होता. धोनीने जबरदस्त बॅटिंग करत सौरव गांगुली आणि रवी शास्त्रीचे लक्ष वेधून घेतले होते. धोनी क्रिकेट जगतात स्वतःसाठी स्थान निर्माण करत होता, तेव्हा मायदेशात मात्र धोनीच्या वैयक्तिक जीवनात आक्रित घडले होते. प्रियांकाचा एका रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. धोनीला याची पुसटीशी कल्पनाही नव्हती. तो जेव्हा भारतात आला तेव्हा त्याला ही घटना घडली.

धोनीने घेतला होता ब्रेक

धोनीने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता अशी ही घटना होती. या दुर्दैवी घटनेनंतर धोनी पूर्ण कोलमडून गेला होता. पण धोनीने कधी हार मानली नाही. धोनीची लव्हस्टोरी विधिलिखातसमोर अपयशी ठरली होती. अशा परिस्थितीही धोनीने भारतीय क्रिकेट संघात स्वतःचे स्थान पक्के केले. त्यानंतर २०१०मध्ये धोनीने साक्षी सिंह हिच्याशी लग्न केले.

असे म्हटले जाते की धोनी प्रियांकाला कधीच विसरू शकला नाही, त्यामुळेच त्याने दिग्दर्शक नीरज पांडे यांनी सिनेमात प्रियांकाचा समावेश करण्याची परवागनी दिली होती. या सिनेमात दिशा पटानीने प्रियांका झा हिची भूमिका केली आहे.

ms dhoni unfinished love story
Janhvi Kapoor : जान्हवी कपूरने शेअर केले एम एस धोनी अन्‌ साक्षीसोबतचे सुंदर क्षण

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news