Mitchell Starc Ashes Record: ॲशेसच्या इतिहासात आजपर्यंत कोणाला जमलं नाही ते मिचेल स्टार्कनं करून दाखवल!

मिचेल स्टार्ककडे आता वसीम अक्रम याचा देखील विक्रम मोडण्याची संधी आहे.
Mitchell Starc
Mitchell Starc Ashes Record Pudhari photo
Published on
Updated on

Mitchell Starc 1st Ashes Test 2025:

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील ॲशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला आजपासून सुरूवात झाली. पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कनं दमदार गोलंदीज करत इंग्लंडच्या फलंदाजांना चांगलीच धडकी भरवली. मिचेल स्टार्कनं पहिल्या डावात ५८ धावात तब्बल ७ विकेट्स घेतल्या.

याचबरोबर त्यानं ॲशेसच्या इतिहासात आतापर्यंत कोणाला जमला नाही असा विक्रम आपल्या नावावर केला. त्यानं इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूटला भोपळाही न फोडता माघारी धाडलं. स्टार्कने मार्नस लाबुशेनकरवी रूटला झेलबाद केलं. ही त्याची ॲशेसमधील १०० वी विकेट ठरली. अॅशेसमध्ये शंभर विकेट्स घेणारा तो २१ वा गोलंदाज ठरला.

Mitchell Starc
IND vs SA 2nd Test : ऋषभ पंत टीम इंडियाचा कर्णधार! दुखापतीमुळे गिल गुवाहाटी कसोटीतून बाहेर

रूटची शिकार करत विक्रम...

मात्र याचसोबत त्यानं एक मोठा विक्रम देखील आपल्या नावावर केला. मिचेल स्टार्क हा ॲशेसमध्ये १०० वी विकेट घेणारा पहिला डावखुरा वेगवान गोलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर तो ऑस्ट्रेलियाकडून प्रतिष्ठेच्या ॲशेस मालिकेत विकेट्सचं शतक साजरा करणारा १३ वा फलंदाज ठरला.

ऑस्ट्रेलियाचे दोन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आणि जोश हेजलवूड हे दुखापतग्रस्त आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत स्कॉट बोलँड आणि ब्रँडन डॉगेट यांनी मिचेल स्टार्कला उत्तम साथ दिली.

Mitchell Starc
Guwahati Pitch Report: कोलकात्यात किरकिरी झाली आता गुवाहाटीची खेळपट्टी तरी टीम इंडियावर प्रसन्न होणार?

रडारवर अक्रम

मिचेल स्टार्ककडे आता वसीम अक्रम याचा देखील विक्रम मोडण्याची संधी आहे. डावखुऱ्या वेगवान गोलंदांकडून कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम वसीम अक्रमच्या नावावर आहे. त्यानं ४१४ कसोटी विकेट्स घेतल्या आहेत. ॲशेस मालिका संपेपर्यंत मिचेल स्टार्क सातत्यानं खेळला तर तो हा विक्रम मोडण्याची शक्यता आहे.

Mitchell Starc
FIFA World Cup 2026 : गोलांचा वर्षाव करत जर्मनी, नेदरलँडस्‌‍ची विश्वचषकात धडक

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडचा डाव १७२ डावात संपुष्टात आला. इंग्लंडकडून हॅरी ब्रुक्सनं सर्वाधिक ५२ धावा केल्या. त्याला पोपने ३६ तर स्मिथने ३३ धावा करून चांगली साथ दिली.

ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची देखील दुसऱ्या डावात भंबेरी उडाली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या ९ बाद १२३ धावा झाल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून अॅलेक्स कॅरीनं सर्वाधिक २६ धावा केल्या. तर इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सनं ५ तर कार्से आणि जोफ्रा आर्चरनं प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

पर्थ कसोटीतील ऑस्ट्रेलियाची प्लेईंग ११

उस्मान ख्वाजा, जॅक वेदरल्ड, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ (कर्णधार), ट्रेविस हेड, कॅमरन ग्रीन, एलेक्स कॅरी (विकेट कीपर), मिचेल स्टार्क, नाथन लियोन, ब्रँडन डॉगेट, स्कॉट बोलँड

पर्थ कसोटीतील इंग्लंडची प्लेईंग ११

बेन डकेट, जॅक क्रॉउली, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेट कीपर), गस एटकिंसन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, मार्क वुड

ॲशेस मालिकेचे शेड्यूल (2025–26) भारतीय वेळेनुसार सामन्याची वेळ

  • पहिली कसोटी : 21–25 नोव्हेंबर, पर्थ

  • दुसरी कसोटी : 4-8 डिसेंबर, गाबा, ब्रिस्बेन (D/N), 9.30 वाजता

  • तिसरी कसोटी : 17-21 डिसेंबर, एडिलेड ओवल, सकाळी 5 वाजता

  • चौथी कसोटी : 26-30 डिसेंबर, मेलबर्न, सकाळी 5 वाजता

  • पाचवी कसोटी : 4-8 जानेवारी, सिडनी, सकाळी 5 वाजता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news