

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : वर्ल़्ड चॅम्पियनशिप स्पर्धेतील सिल्वर पदक विजेती श्रावणी कटके ही गुजरात येथे होणाऱ्या ३६ व्या युवा खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेत वुशू खेळ प्रकारात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र वुशू संघ पुणे येथून रवाना झाला आहे.
या संघात सांन्सू प्रकारात मुलांमध्ये ५६ किलो आतील ओमकार पवार, संकेत पाटील ६० किलो आतील, ऋषिकेश मालोरे ६५ किलो आतील, प्रथमेश शेट्टी ७० किलो आतील, निर्मल शेटे ७५ किलो आतील व मुलींमध्ये ऋतूजा सुर्वे ६० किलो आतील तर ताऊलू या प्रकारात श्रावणी कटके महाराष्ट्र राज्य संघाचे नेतृत्व करणार आहे.
सान्सू प्रकारात महेश इंदापुरे व ताऊलू प्रकारात संदीप शेलार हे प्रशिक्षक आहेत. संघ व्यवस्थापक स्नेहा बेळखंडे व फुलचंद जावळे यांच्यासह वेगवेगळ्या गटातील एकूण 10 खेळाडू व 2 प्रशिक्षक या स्पर्धेसाठी गुजरातला रवाना झाले. या स्पर्धेत ३५ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य प्राप्त केलेली, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडू श्रावणी कटके महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. यावेळी ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशनचे महासचिव शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त सोपान कटके यांनी सर्व खेळाडू महाराष्ट्राला सुवर्ण पदक मिळवून देतील, अशी अपेक्षा व्यक्त करत संघाला शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा :