अटीतटीच्या लढतीत महाराष्ट्र खोखो संघाचा गुजरात संघावर विजय

अटीतटीच्या लढतीत महाराष्ट्र खोखो संघाचा गुजरात संघावर विजय

पुढारी ऑनलाइन डेस्क : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र खोखो संघाने पुरुष गटात अटीतटीच्या लढतीत यजमान गुजरात संघावर दोन गुण व सहा मिनिटे राखून विजय मिळवत आगेकूच केली. महाराष्ट्र पुरुष खोखो संघाला गुजरात संघाने चांगलेच झुंजविले. चुरशीच्या लढतीत महाराष्ट्र संघाने गुजरातचा 28-26 असा पराभव केला. या लढतीत महाराष्ट्र संघाकडून अक्षय भांगरे, ह्रषिकेश मुर्चावडे, लक्ष्मण गावस, अविनाश देसाई, सुयश गारगाटे, प्रतिक वाईकर, रामजी कश्यप या खेळाडूंनी चमकदार कामगिरी बजावली आणि संघाचा पहिला विजय साकारला.

आता शनिवारी महाराष्ट्र संघाचा सामना दिल्ली संघाशी सकाळी 9.30 वाजता होणार आहे.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news