‘मांसाहार करताना शिस्त पाळा’ – सरसंघसंचालक मोहन भागवत यांचे मोठे वक्तव्य Mohan Bhagwat On Non Veg | पुढारी

'मांसाहार करताना शिस्त पाळा' - सरसंघसंचालक मोहन भागवत यांचे मोठे वक्तव्य Mohan Bhagwat On Non Veg

'मांसाहार करताना शिस्त पाळा' - सरसंघसंचालक मोहन भागवत यांचे मोठे वक्तव्य

पुढारी ऑनलाईन – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघसंचालक मोहन भागवत यांनी मांसाहार करणाऱ्या व्यक्तींना “शिस्त पालनाचा” सल्ला दिला आहे. ज्या अन्नपदार्थांत अत्यंतिक हिंसा असते ते आपल्याला हिंसेच्या मार्गावर नेतात, असे त्यांनी म्हटले आहे. लोकांनी तामसिक अन्नपदार्थ टाळले पाहिजेत, असे त्यांनी म्हटले आहे. Mohan Bhagwat On Non Veg

नागपूरमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, “चुकीचे अन्नपदार्थ आपल्याला चुकीच्या मार्गावर नेतात. त्यामुळे शिस्त पाळली पाहिजे.” भारतात जे लोक मटण आणि मासे खातात ते श्रावण महिन्यात शाकाहार करतात तसेच आठवड्यातील काही दिवस मांसाहार करत नाहीत, मांस खात असाल तर तुम्हाला शिस्त पाळली पाहिजे, जेणे करून तुमचे मन एकाग्र राहील.

“अध्यात्म हा भारताचा आत्मा आहे. श्रीलंका आणि मालदिवसारखे देश संकटात असताना भारताने मदत केली, तर इतर देश फक्त व्यावसायिक संधी शोधत होते. कोणत्याही अहंकारशिवाय आयुष्य जगता आले पाहिजे. अमेरिका, चीन, पाकिस्तान सारख्या राष्ट्रांनी जेव्हा व्यावसायिक संधी दिसली तेव्हाच श्रीलंकेला मदत देऊ केली,” असे ते म्हणाले.

हेही वाचा

Back to top button