London Marathon : सेबॅस्टियनने ओलांडली २ तासांची ‘भिंत’

मॅरेथॉनमध्ये १ तास ५९ मिनिटे ३० सेकंदांचा नवा विश्वविक्रम
London Marathon
सेबॅस्टियन सावेpudhari photo
Published on
Updated on

लंडन : वृत्तसंस्था

खेळाच्या जगातील आजवरचा सर्वात अशक्य मानला जाणारा विक्रम रविवारी मोडीत निघाला. केनियाच्या सेबॅस्टियन सावेने लंडन मॅरेथॉनमध्ये २ तासांची भिंत पाडत २६.२ मैलांचे (४२.२ कि.मी.) अंतर अवघ्या १ तास ५९ मिनिटे ३० सेकंदात पूर्ण केले. मानवी क्षमतेच्या पलीकडे मानला जाणारा हा टप्पा पार करत सावेने जुन्या विश्वविक्रमात तब्बल ६५ सेकंदांची सुधारणा केली आहे.

लंडन स्ट्रीटवर वेगाचा थरार

धावण्यासाठी पोषक वातावरण आणि सपाट ट्रॅकचा फायदा घेत आफ्रिकन धावपटूंनी लंडनमध्ये इतिहास रचला. सावेपाठोपाठ इथिओपियाच्या योमिफ केजेल्चाने आपली पहिलीच मॅरेथॉन १:५९:४१ वेळेत पूर्ण करत दुसरे स्थान पटकावले. युगांडाचा जेकब किप्लिमो २:००:२८ वेळेसह तिसऱ्या स्थानी राहिला. विशेष म्हणजे, पहिल्या तिन्ही धावपटूंनी केल्विन किप्टमचा ३ वर्षे जुना विश्वविक्रम मोडीत काढला.

सावेची ऐतिहासिक भरारी

सावेने शर्यतीचा उत्तरार्ध अधिक वेगाने पूर्ण केला. शर्यतीचे दुसरे निम्मे अंतर त्याने अवघ्या ५९ मिनिटे ०१ सेकंदात पार करून सर्वांना थक्क केले.

London Marathon
T20 World Cup Final : भारत तिसऱ्यांदा विश्वविजेता! अहमदाबादमध्ये किवींचा ९६ धावांनी धुव्वा उडवत रचला इतिहास

ठळक मुद्दे :

नवा विश्वविक्रम : १ तास ५९ मिनिटे ३० सेकंद (सेबॅस्टियन सावे).

जुन्या विक्रमाशी तुलना : केल्विन किप्टमच्या विक्रमापेक्षा ६५ सेकंदांनी वेगवान कामगिरी.

दुसऱ्या सत्रात वेग : शर्यतीच्या दुसऱ्या भागात सावेने कमालीचा वेग राखला.

मॅरेथॉनच्या इतिहासात २ तासांच्या आत शर्यत पूर्ण होणे हा एका नव्या युगाचा प्रारंभ मानला जात आहे.

मॅरेथॉनच्या इतिहासातील सुवर्णक्षण!

विजेता : सेबॅस्टियन सावे

वेळ : १:५९:३०

विक्रम : २ तासांचा अडथळा ३० सेकंदांनी मोडला!

रेकॉर्ड बुक काय सांगते?

जुना विक्रम : २:००:३५ (केल्विन किप्टम)

नवा विक्रम: १:५९:३० (सेबेस्टियन सावे)

फरक : ६५ सेकंद वेगवात

सावेचा वेग (स्प्लिट टायमिंग):

पहिला अर्धा भाग (२१ कि.मी.) १:००:२९

दुसरा अर्धा भाग (२१ कि.मी.) ५९:०१

इथिओपियाच्या योमिफ केजेल्वाने ही मॅरेथॉन १ तास ४९ मि. ४१ सेकंदात पूर्ण करत दुसरे स्थान गाठले.
इथिओपियाच्या योमिफ केजेल्वाने ही मॅरेथॉन १ तास ४९ मि. ४१ सेकंदात पूर्ण करत दुसरे स्थान गाठले.

सावेची 'सुपरफास्ट' आकडेवारी

वेगाचे गणित :

  • सेबेस्टियन सावेचा सरासरी वेग ताशी २१.२ कि. मी. इतका होता.

  • म्हणजेच त्याने प्रत्येक किलोमीटरचे अंतर सरासरी २ मिनिटे ४२ सेकंदात कापले.

  • सामान्य माणूस ज्या वेगाने धावतो, त्यापेक्षा हा वेग जवळपास दुप्पट आहे.

London Marathon
Smuggling case JNPT : जेएनपीएमध्ये टरबूज बी,चिनी फटाके जप्त

लंडनचे 'लकी' हवामान

यशाचे सूत्र :

मॅरेथॉनवेळी लंडनचे तापमान १५ अंश सेल्सिअस होते आणि आकाश निरभ्र होते. धावपटूंसाठी हे आदर्श हवामान मानले जाते. याच अनुकूल परिस्थितीमुळे पहिल्या तिन्ही स्पर्धकांनी जुना विश्वविक्रम मोडीत काढला.

तासांची 'अदृश्य' भितः

इतिहासाची पुनरावृत्ती :

मॅरेथॉनमध्ये २ तासांच्या आत शर्यत पूर्ण करणे हे चंद्रावर पाऊल ठेवण्याइतकेच कठीण मानले जात होते. यापूर्वी २०१२ मध्ये एलियड किपचोगेने व्हिएन्नामध्ये हा टप्पा पार केला होता; पण ती 'ओपन रेस' नसल्याने त्याला अधिकृत विश्वविक्रम मानले गेले नव्हते. सावेने अधिकृत स्पर्धेत हा चमत्कार करून दाखवला.

पुढचे लक्ष्य : १० लाखांचे बक्षीस?

बक्षिसांचा पाऊस :

या ऐतिहासिक कामगिरीमुळे सावेवर केवळ कौतुकाचाच नाही, तर बक्षिसांचाही वर्षाव होणार आहे. अनेक मोठ्या कंपन्यांनी २ तासांच्या खाली मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्या धावपटूसाठी लाखो डॉलर्सचे विशेष 'बोनस' जाहीर केले होते.

आजचे यश केवळ माझे नसून आपल्या सर्वांचे आहे!

सेबॅस्टियन सावे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news