Smuggling case JNPT : जेएनपीएमध्ये टरबूज बी,चिनी फटाके जप्त

तस्करीचा 139 कोटींचा मुद्देमाल हस्तगत
Smuggling case JNPT
जेएनपीएमध्ये टरबूज बी,चिनी फटाके जप्तpudhari photo
Published on
Updated on

उरण ः महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई पथकाने जेएनपीए बंदरात तस्करीविरोधात एक मोठी मोहीम राबवून तब्बल 139 कोटी रुपये किमतीचा प्रतिबंधित कृषी माल जप्त केला आहे. तूर डाळ आयात करत असल्याचे भासवून टांझानिया, सुदान आणि कॅनडातून टरबूज बिया आणि हिरव्या वाटाण्याची अवैध आयात करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या आयातदार कंपनीच्या मालकाला अटक करण्यात आली आहे.

जेएनपीए बंदरातून काही कंटेनर्समध्ये प्रतिबंधित मालाची तस्करी होणार असल्याची खात्रीलायक माहिती डीआरआयला मिळाली होती. त्या आधारे अधिकाऱ्यांनी सापळा रचून 132 कंटेनर्सची तपासणी केली. कागदपत्रांवर या मालाची घोषणा तूर डाळ/पिजन पीज अशी करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्ष तपासणी केली असता त्यात धक्कादायक वास्तव समोर आले.

Smuggling case JNPT
IND vs SA 5th T20 : भारताचा मालिकेवर 3-1ने कब्जा! शेवटच्या सामन्यात द. आफ्रिकेवर 30 धावांनी दमदार विजय

या मालामध्ये टांझानिया आणि सुदानमधून आलेल्या 2,710 मेट्रिक टन टरबूज बिया आणि कॅनडामधून आयात केलेला 319 मेट्रिक टन हिरवा वाटाणा असल्याचे सखोल तपासणीअंती आढळून आले. जप्त केलेल्या मालाचे एकूण मूल्य सुमारे 139 कोटी रुपये आहे.सरकारने लादलेले आयात निर्बंध टाळण्याच्या उद्देशाने हेतुपुरस्सर चुकीची माहिती दिल्याचे तपासात उघड झाले आहे.

डीजीएफटीच्या नियमांनुसार, जून 2024 नंतर टरबूज आणि खरबुजाच्या बियांच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच, हिरव्या वाटाण्याच्या आयातीसाठी प्रति किलो 200 रुपये किमान आयात किंमत निश्चित करण्यात आली असून त्याची आयात केवळ कोलकाता बंदरातूनच करणे बंधनकारक आहे. हे सर्व निर्बंध झुगारून आणि कर चोरी करण्याच्या उद्देशाने ही तस्करी केली जात होती. या संघटित तस्करी प्रकरणात आयात करणाऱ्या कंपनीच्या मालकाला 19 एप्रिल रोजी डीआरआय ने अटक केली आहे.

Smuggling case JNPT
IND vs NZ Score : न्यूझीलंडचा ऐतिहासिक विजय; भारताचा ७ गडी राखून पराभव करत मालिकेत १-१ ने बरोबरी

या रॅकेटमध्ये आणखी कोणाचे हात गुंतले आहेत, याचा अधिक तपास सुरू आहे. देशाच्या आर्थिक हितांचे रक्षण करणे आणि देशांतर्गत उत्पादकांना न्याय्य स्पर्धा मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आयात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात आमची ही मोहीम अधिक तीव्र केली जाईल.,अशी माहिती डीआरआय अधिक़ाऱ्यांकडून देण्यात आली.

ऑपरेशन पायरो हाईस्ट अंतर्गत डीआरआयची धडक कारवाई

देशात बेकायदेशीरपणे चिनी फटाक्यांची तस्करी करणाऱ्या एका मोठ्या सिंडिकेटचा महसूल गुप्तचर संचालनालयाने पर्दाफाश केला आहे. ऑपरेशन पायरो हाईस्ट या विशेष मोहिमेअंतर्गत न्हावा शेवा बंदरात तब्बल 70 मेट्रिक टन चिनी फटाके जप्त करण्यात आले असून, त्यांची बाजारपेठेतील किंमत 17.07 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

डीआरआयच्या मुंबई युनिटने जेएनपीए बंदरावर पाळत ठेवली होती. यावेळी चार कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणात फटाके साठवण्यात आल्याचे आढळले. विशेष म्हणजे, सीमा शुल्क विभागाची नजर चुकवण्यासाठी या मालाची चुकीची घोषणा करण्यात आली होती. कागदोपत्री हा माल निरुपद्रवी वस्तू असल्याचे दाखवण्यात आले होते.

तस्करांनी केवळ माल लपवला नाही, तर बंदरातील कंटेनर फ्रेट स्टेशन मध्येच कंटेनरचे सील तोडून फटाके दुसऱ्या ट्रकमध्ये भरण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क डीआरआय अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी सिंडिकेटच्या दोन मुख्य सदस्यांना अटक करण्यात आली असून, या बेकायदेशीर कामात सहकार्य केल्याबद्दल संबंधित कंटेनर फ्रेट स्टेशनचा परवानाही निलंबित करण्यात आला आहे.

Smuggling case JNPT
IND vs NZ 3rd ODI : इंदूरमध्ये न्यूझीलंडचा ऐतिहासिक विजय! भारताचा बालेकिल्ला ढासळला; किवींचा प्रथमच मालिका विजय

या यशस्वी कारवाईमुळे तस्करी करणाऱ्या टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत. डीआरआय ने पुन्हा एकदा आपली तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि तस्करीविरुद्धचा झिरो टॉलरन्स दृष्टिकोन सिद्ध केला आहे. देशाची बंदरे आणि पुरवठा साखळी सुरक्षित ठेवण्यासाठी अशा कारवाया भविष्यातही सुरू राहतील, असा इशारा विभागाने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news