kapil dev
kapil dev pudhari

Bengaluru Stampede | सेलिब्रेशनपेक्षा जीव महत्वाचा; थोडं शहाणपणाने हाताळा... RCB च्या विजयी मिरवणुकीतील गोंधळावर कपिल देव यांचे मत

Bengaluru Stampede | कर्नाटक सरकारकडून मृतांच्या कुटूंबियांना 50 लाखांची मदत जाहीर
Published on

Kapil Dev on Bengaluru stampede

बंगळुरू : 1983च्या विश्वचषक विजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) च्या IPL विजय मिरवणुकीदरम्यान घडलेल्या दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. या मिरवणुकीदरम्यान निर्माण झालेल्या गोंधळात तब्बल 11 चाहत्यांचा मृत्यू झाला आणि अनेकजण जखमी झाले. यावर प्रतिक्रिया देताना कपिल देव म्हणाले, "सेलिब्रेशनपेक्षा जीव महत्त्वाचे आहेत."

मंगळवारी (4 जून) झालेल्या मिरवणुकीसाठी M. चिन्नास्वामी स्टेडियमच्या परिसरात अंदाजे अडीच लाख लोकांची गर्दी जमली होती. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात यंत्रणांना अपयश आल्यामुळे मोठा अपघात घडला.

कपिल देव यांची प्रतिक्रिया

एका कॉर्पोरेट कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना कपिल देव म्हणाले की, "मला याचे खूप वाईट वाटते. आपण एकमेकांकडून शिकले पाहिजे. पुढच्या वेळी अशी कोणतीही मिरवणूक किंवा मोठा उत्सव असेल, तर अधिक जबाबदारीने वागले पाहिजे. लोक चुकतात, पण ती चूक एवढी मोठी नसावी की जिथे आनंद साजरा करताना जीव गमवावे लागतात."

ते पुढे म्हणाले, "पुढील वेळेस अशा प्रकारच्या कार्यक्रमांना थोडं शहाणपणानं हाताळा. साजरा करावा, पण शांतपणे. कारण जीव अधिक महत्त्वाचे आहेत."

kapil dev
England vs India Test series | भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचा तगडा संघ जाहीर; 'या' दोन खेळाडुंच्या निवडीने धक्का

भारताच्या इंग्लंड दौऱ्याबाबत आशावादी

आगामी पाच कसोटी सामन्यांच्या इंग्लंड दौऱ्याबाबत कपिल देव यांनी आशा व्यक्त केली की, "भारतीय संघ चांगला आहे. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. टीम स्पिरिट महत्वाचे आहे. जर सर्वांनी एकसंघ खेळ केला, तर चांगले यश मिळेल. शुभमन गिल असो की जसप्रीत बुमराह – हे खेळाडू केवळ वैयक्तिक कामगिरीपुरते मर्यादीत नाहीत. संघभावनेचे महत्त्व जास्त आहे."

गोल्फमध्ये नवीन प्रवास

क्रिकेटमधून निवृत्तीनंतर कपिल देव सध्या गोल्फमध्ये अधिक सक्रिय आहेत. "क्रिकेट, टेनिस, फुटबॉलसारखे खेळ ठराविक वयापर्यंतच खेळता येतात. पण मी जेव्हा गोल्फ खेळायला सुरुवात केली, तेव्हा जाणवले की हा खेळ तुम्ही कितीही वयात खेळू शकता. त्यामुळे तो एक स्पोर्ट्समन म्हणून मला टिकवून ठेवतो."

कपिल देव सध्या प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत आणि ते स्वत: स्पर्धात्मक पातळीवर गोल्फ खेळत आहेत.

kapil dev
Kuldeep Yadav Engagement | 'कुलदीप यादव'ची प्रेमाच्या मैदानात पडली 'विकेट'; गुपचूप उरकला साखरपुडा, कोण आहे त्याची बालपणीची मैत्रीण?

5 दिवसांत अहवाल देण्याचे कर्नाटक उच्च न्यायालयाचे निर्देश

दरम्यान, RCB च्या विजय मिरवणुकीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेबाबत कर्नाटक उच्च न्यायालयाने राज्य सरकारला 5 दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या घटनेच्या चौकशीसाठी न्यायालयाने राज्य सरकारला त्वरित कारवाईचे आदेश दिले. न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले आहे की, “आनंदाचा सण, मृत्यूचा शोक बनू नये.”

कर्नाटकच्या गृह विभागाकडून स्वतंत्र चौकशी समिती नेमली जाणार आहे. सरकारने प्रत्येक मृताच्या कुटुंबाला 50 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. गर्दी नियंत्रणात अपयश का आले, यावर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे.

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी भाजपने या घटनेचे राजकारण केल्याचा आरोप केला. त्यांनी या प्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news