England vs India Test series | भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचा तगडा संघ जाहीर; 'या' दोन खेळाडुंच्या निवडीने धक्का

England vs India Test series | पोप आणि क्रॉलीचे संघातील स्थान धोक्यात?; पहिल्या कसोटीत कोण खेळणार, कोण बाहेर? जाणून घ्या...
England vs India Test series 2025 | shubman gill | ben stokes
England vs India Test series 2025 | shubman gill | ben stokesPudhari
Published on
Updated on

Test series India tour of England 2025 England squad announcement vs India for 1st Test

लंडन : भारताविरुद्धच्या पाच कसोट्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडने गुरुवारी 14 सदस्यीय संघाची घोषणा केली असून, अष्टपैलू खेळाडू जेमी ओव्हर्टन आणि जेकब बेथेल या दोन खेळाडुंचे संघात झालेले पुनरागमन धक्कादायक मानले जात आहे.

ओव्हर्टनने 2022 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध एकमेव कसोटी खेळली होती, ज्यामध्ये त्याने दोन विकेट घेतल्या होत्या आणि 97 धावा करून आश्चर्याचा धक्का दिला होता.

तथापि, ओव्हर्टन सध्या बोटाला झालेल्या दुखापतीमुळे पूर्णतः तंदुरुस्त नाही आणि 20 जून रोजी हेडिंग्ले येथे होणाऱ्या पहिल्या कसोटीत तो खेळू शकेल का, हे अजून स्पष्ट झालेले नाही.

ओव्हर्टनची दररोज तपासणी होणार

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने (ECB) दिलेल्या माहितीनुसार ओव्हर्टनची वैद्यकीय टीमकडून दररोज तपासणी व मूल्यमापन केले जाईल. दरम्यान, त्याचा संघातील समावेश हा एक आश्चर्याचा विषय ठरला आहे.

तसेच ओव्हर्टनचा सहकारी आणि सरे काऊंटीचा जलदगती गोलंदाज गस अ‍ॅटकिन्सन याला झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात हॅमस्ट्रिंगला झालेल्या दुखापतीमुळे वगळण्यात आले आहे.

पुनरागमन करणारे खेळाडू

क्रिस वोक्स आणि ब्रायडन कार्स, हे दोघेही हंगामाच्या सुरुवातीला दुखापतीमुळे खेळू शकले नव्हते, त्यांचे आता संघात पुनरागमन झाले आहे.

वोक्सला सॅम कुकच्या जागी संधी मिळू शकते. कुकने झिम्बाब्वेविरुद्ध शांत सुरुवात केली होती पण संघात कायम ठेवण्यात आला आहे.

जेकब बेथेलची अंतिम 11 मध्ये निवड होणार का? याची उत्सुकता

21 वर्षीय जेकब बेथेल हा IPL स्पर्धेतील विजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु संघात होता आणि आता तो इंग्लंड संघात परतला आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर तीन अर्धशतके ठोकून 52 च्या सरासरीने धावा केल्या होत्या.

त्यामुळे आता उपकर्णधार ओली पोप आणि झॅक क्रॉली यांच्यावर संघात स्थान मिळविण्यासाठी दबाव निर्माण झाला आहे. तथापि, या दोघांनीही झिम्बाब्वेविरुद्ध शतके झळकावून आपली दावेदारी मजबूत केली आहे.

बेथेल याच्या पुनरागमनामुळे टॉप ऑर्डरमध्ये कुणाला खेळवायचे असा प्रश्न इंग्लंड संघ व्यवस्थापनासमोर असणार आहे.

असा आहे इंग्लंडचा 14 सदस्यीय संघ

बेन स्टोक्स (कर्णधार), शोएब बशीर, जेकब बेटेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, सॅम कुक, झॅक क्रॉली, बेन डकेट, जेमी ओव्हर्टन, ओली पोप, जो रूट, जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), जोश टंग, क्रिस वोक्स.

पहिली कसोटी 20 जून 2025 रोजी हेडिंग्ले येथे खेळवली जाणार असून, ही मालिका दोन्ही संघांसाठी आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी महत्त्वाची मानली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news