Sarabjot Singh : मनू भाकरसोबत ऑलिम्पिक गाजवणारा सरबज्योत सिंग कोण आहे?

ऑलिम्पिक गाजवणार सरबज्योत हरियाणातील धीन गावचा रहिवासी
Let's know who is Sarabjot Singh who played Olympics with Manu Bhakar...
Sarabjot Singh : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात मनू भाकर आणि सरबज्योत सिंग या जोडीने कांस्यपदक पटकावले. Sarabjot Singh
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क | Sarabjot Singh : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात मनू भाकर आणि सरबज्योत सिंग या जोडीने कांस्यपदक पटकावले. मनू भाकर ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे. मनू भाकरसह ऑलिंम्पिक गाजवणारा सरबज्योत आहे तरी कोण? जाणून घेवूयात त्याच्याबद्दल...

Let's know who is Sarabjot Singh who played Olympics with Manu Bhakar...
नाशिक : ठाकरे गटाच्या फेसबुकपेजवर पोस्ट केला अश्लिल व्हिडीओ, सायबर पोलिसांत तक्रार

ऑलिम्पिक गाजवणारा सरबज्योत सिंग हा हरियाणातील धीन गावचा रहिवासी आहे. नेमबाज सरबजोतने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये प्रथमच कांस्यपदक जिंकून विक्रम केल्यानंतर त्याच्या गावासह संपूर्ण देशभरात त्याचा जयजयकार केला जात आहे.

सरबज्योतचे पहिलेच ऑलिम्पिक पदक

सरबज्योतचे हे ऑलिम्पिकमधील पहिले पदक आहे. तर, मनू भाकरने दुसरे पदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. दुपारी 1 वाजता सरबजोत आणि मनू भाकर यांच्यातील सामना सुरू झाला तेव्हा सरबजोतचे वडील जितेंद्र सिंह आपल्या सहकाऱ्यांसह अंबाल कॅन्टोन्मेंटमध्ये असलेल्या शूटिंग ॲकॅडमीमध्ये सामना पाहत होते.

त्यावेळी ते म्हणाले की, माझा मुलगा ऑलिम्पिकमध्ये नक्कीच जिंकेल, असा विश्वास आहे. यावेळी पुढे म्हणाले, मला त्याचा फोन आला होता. तेव्हा मी त्याला म्हणालो की माझा तुझ्यावर विश्वास आहे, पूर्ण लक्ष देऊन सामना खेळ आणि जिंकण्याची किंवा हरण्याची चिंता करू नकोस. विजय मिळवून ये, देव तुम्हाला पूर्ण साथ देईल.

Let's know who is Sarabjot Singh who played Olympics with Manu Bhakar...
पिंपळनेर : पश्चिम पट्ट्यामध्ये कृषी विभागाच्या वतीने जिल्हा मासिक चर्चासत्र

यूट्यूबवर व्हिडिओ पाहिल्यानंतर झाली शूटिंगची आवड

यूट्यूबवर शुटिंगचे व्हिडिओ पाहिल्यानंतर सरबज्योत सिंगने शूटिंगमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला होता. सरबज्योतने कठोर परिश्रम घेवून यामध्ये प्राविण्या मिळवले आहे. सरबज्योत सिंग हा शेतकरी जितेंद्र सिंग यांचा मुलगा आहे. शेतकरी असूनही जितेंद्र सिंह यांनी आपल्या मुलाची स्वप्ने सत्यात उतरवण्यात पूर्ण साथ दिली.

Let's know who is Sarabjot Singh who played Olympics with Manu Bhakar...
Wayanad landslide | केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन, ६० जणांचा मृत्यू, शेकडो लोक ढिगाऱ्याखाली अडकले

शाळेच्या दिवसात केली शूटिंगला सुरुवात

सरबज्योत सिंगच्या शुटिंगच्या प्रवासात त्याच्या आई-वडिलांनी त्याला नेहमीच प्रोत्साहन दिले आणि त्याला शक्य ती सर्व मदत केली. सरबज्योचतचा लहानपणापासूनच खेळाकडे कल होता. त्याने शालेय जीवनातच शूटिंगला सुरुवात केली. सरबज्योतने अंबाला येथील क्लबमध्ये प्रशिक्षक अभिषेक राणा यांच्या अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतले. उच्च शिक्षणासाठी तो दिल्लीला गेला आणि तिथे नेमबाजीचे प्रशिक्षणही सुरू ठेवले.

Let's know who is Sarabjot Singh who played Olympics with Manu Bhakar...
Manu Bhaker Paris Olympics | मनू भाकर-सरबज्योत सिंगचे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये यश ! PM मोदी म्हणाले...

आशियाई स्पर्धेत पटकावले होते पदक

सरबजोतने 2019 साली झालेल्या ISSF ज्युनियर विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. सरबज्योत सिंग 2022 मध्ये चीनमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय नेमबाजी संघाचा एक भाग आहे. तेथील सांघिक स्पर्धेत त्याने सुवर्णपदक पटकावले. सरबजोतने आशियाई क्रीडा स्पर्धेत दिव्या टी.एस. तसेच मिश्र 10 मीटर एअर पिस्तुलमध्ये भारतासाठी रौप्य पदक जिंकले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news