Manu Bhaker Paris Olympics | मनू भाकर-सरबज्योत सिंगचे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये यश ! PM मोदी म्हणाले...

Manu Bhaker Paris Olympics
मनू भाकर-सरबज्योत सिंगचे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये यश ! PM मोदी म्हणाले...Pudhari Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात मनू भाकर आणि सरबज्योत सिंग या जोडीने कांस्यपदक पटकावले. मनू भाकर ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनू भाकरचे खास शब्दात अभिनंदन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की,आमच्या नेमबाज खेळाडूंचा आम्हाला अभिमान वाटत आहे. ऑलिंपिकमध्ये १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल मनू भाकर आणि सरबज्योत सिंग या दोघांचेही अभिनंदन. त्यांनी यातून उत्तम कौशल्य आणि टीमवर्क दाखवले आहे. या यशामुळे भारत कमालीचा आनंदित झाला आहे, असे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

मनूचे सातत्यपूर्ण यश तिचे समर्पण दर्शवते-पीएम मोदी

पुढे पीएम मोदी यांनी म्हटले आहे की, "मनूसाठी, हे तिचे सलग दुसरे ऑलिम्पिक पदक आहे, जे तिची सातत्यपूर्ण उत्कृष्टता आणि समर्पण दर्शवत आहे", असे म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news