Lakshya Sen Japan Masters 2026 : लक्ष्य सेन सुसाट! हायलो ओपननंतर जपान मास्टर्सवरही कोरले नाव

पहिला गेम गमावल्यानंतर दमदार पुनरागमन करत मारली बाजी
Lakshya Sen Japan Masters 2026
Lakshya Sen Japan Masters 2026 Pudhari news
Published on: 
Updated on: 

Lakshya Sen Japan Masters 2026 : भारताच्या लक्ष्य सेनने आज (दि. १५ नोव्हेंबर) कुमामोटो येथे झालेल्या जपान मास्टर्स स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात कोकी वातानाबेचा पराभव करत दमदार पुनरागमन केले. पहिला गेम गमावल्यानंतर पिछाडीवर पडलेल्या लक्ष्य सेनने पुढील दोन गेममध्ये जोरदार पुनरागमन करत १ तास ४ मिनिटांच्या लढतीत १३-२१, २१-१८, २१-१४ अशा फरकाने जपान मास्टर्सवर आपलं नाव कोरले.

लक्ष्य सेन पुन्हा एकदा आपल्या सर्वोत्तम लयीत

जागतिक अजिंक्यपद स्पर्धा (वर्ल्ड चॅम्पियनशिप) आणि आशियाई खेळांमधील निराशाजनक कामगिरीनंतर, लक्ष्य सेन पुन्हा एकदा आपल्या सर्वोत्तम लयीत परतताना दिसत आहे. याआधी त्याने जर्मनीमध्ये 'हायलो ओपन' स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.

Lakshya Sen Japan Masters 2026
Lakshya Sen : लक्ष्य सेनने उमटवली 'ऑस्ट्रेलियन ओपन'वर मोहोर

पहिला गेम गमावला

लक्ष्यची सुरुवात संथ झाली आणि पहिल्या गेममध्ये वातानाबेने मोठी आघाडी घेतली, ज्यामुळे लक्ष्यला १३-२१ असा पराभव पत्करावा लागला. कोर्टाच्या एका बाजूला वाऱ्याचा प्रभाव असतानाही लक्ष्यने मानसिक खंबीरपणा दाखवत सामन्यात कमबॅक केले. दुसरा गेम आपल्या नावावर करत त्याने १-१ अशी बरोबरी साधली.

Lakshya Sen Japan Masters 2026
PV Sindhu : खेलो इंडिया' कागदावरच! युरोप दौऱ्यावर गेलेले भारतीय बॅडमिंटनपटू सरकारी निधीपासून राहिले वंचित

तिसऱ्या निर्णायक गेममध्ये लक्ष्यने गाजवले वर्चस्व

दुसरा गेम २१-१८ असा जिंकल्यानंतर, लक्ष्यसाठी विजयाचा मार्ग सोपा झाला. वातानाबे करत असलेल्या चुका अचूक हेरत लक्ष्यने आपल्या बचावावर पकड कायम ठेवली. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये लक्ष्यने वर्चस्व गाजवले. ११-७ अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतल्यानंतर त्याने एकूण नऊ गुणांची आघाडी मिळवली. त्यानंतर त्याने आपल्या प्रतिस्पर्ध्याला पुनरागमन करण्याची कोणतीही संधी दिली नाही. तिसऱ्या गेममध्ये २१-१४ असा विजय मिळवत स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावावर केले.

Lakshya Sen Japan Masters 2026
India Vs Pakistan U-19 Asia Cup Final : पाकिस्तान चित, टीम इंडिया हिट! अंडर-१९ आशिया कपच्या फायनलमध्ये भारताचा रोमहर्षक विजय

लक्ष्य सेनने सलग दुसऱ्या स्पर्धेत पटकावले विजेतेपद

जपान मास्टर्समधील हा विजय लक्ष्य सेनसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या महिन्याच्या सुरुवातीला जर्मनीमध्ये 'हायलो ओपन' जिंकल्यानंतर, त्याने सलग दुसऱ्या स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे. आता हांगझू येथे होणाऱ्या 'बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्स' (BWF World Tour Finals) मध्ये पात्र ठरण्याच्या आशा अधिक उजळल्या आहेत. 'जपान मास्टर्स' स्पर्धेपूर्वी लक्ष्य वर्ल्ड टूर क्रमवारीत ६४,९८० गुणांसह १२ व्या स्थानावर होता. 'बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्स'मध्ये केवळ अव्वल आठ बॅडमिंटनपटूच पात्र होतात. आता 'सुपर ५००' स्पर्धेतील विजेतेपदाने त्याला ९,२०० रँकिंग गुण मिळवून दिले आहेत. त्यामुळे अव्वल आठमध्ये स्थान मिळवण्याच्या त्याच्या प्रयत्नांना मोठी चालना मिळाली आहे. आता 'हाँगकाँग ओपन' आणि 'सैयद मोदी इंटरनॅशनल' या स्पर्धा बाकी असल्याने पात्रतेच्या शर्यतीत अजूनही मोठे बदल पाहायला मिळू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.