India Vs Pakistan U-19 Asia Cup Final : पाकिस्तान चित, टीम इंडिया हिट! अंडर-१९ आशिया कपच्या फायनलमध्ये भारताचा रोमहर्षक विजय

मोहित उल्‍वाची विजय आणला खेचून, कर्णधार लक्ष्‍य रायचंदानीसह, आर्यवीर सेहवान, मनाल चौहानची खेळी ठरली निर्णायक
India Vs Pakistan U-19 Asia Cup Final : पाकिस्तान चित, टीम इंडिया हिट! अंडर-१९ आशिया कपच्या फायनलमध्ये भारताचा रोमहर्षक विजय
Published on: 
Updated on: 

India Vs Pakistan U-19 Asia Cup Final 2026 :कर्णधार लक्ष्‍य राजेश रायचंदानी याची दमदार ८० धावांची खेळी, दुखापतग्रस्‍त असूनही सलामीवीर आर्यवीर सेहवान यांच्‍या संयमित ५८ धावा, अखेरच्‍या षटकांमध्‍ये मनाल चौहान आणि मोहित उल्वा यांची निर्णायक भागीदारीच्‍या जोरावर भारताच्या युवा संघाने अंडर-१९ आशिया कप २०२६ च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करत ट्रॉफीवर आपले नाव कोरले. पाकिस्तानने विजयासाठी दिलेले ३३८ धावांचे महाविशाल लक्ष्याच्‍या अचूक पाठलाग करत विजय अक्षरक्ष खेचून आणला. मोहित उल्वाने शेवटच्या चेंडूवर चौकार मारत भारताच्‍या विजयावर शिक्‍कामोर्तब केले.

पाकिस्तानचे ३३७ धावांचे मोठे आव्हान

या महामुकाबल्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ५० षटकांत ९ गडी गमावून पाकिस्तानने ३३७ धावांचा डोंगर उभा केला. पाकिस्तानकडून सलामीवीर उस्मान खानने धमाकेदार शतक (१०७ धावा) झळकावले, तर अब्दुल कादिर (८० धावा) आणि कर्णधार फरहान युसूफ (६३ धावा) यांनी अर्धशतके झळकावली.

काव्या पटेलच्‍या ४ विकेट

एक वेळ पाकिस्तानची धावसंख्या ४०० च्या दिशेने जात असल्याचे दिसत होते; मात्र भारतीय गोलंदाजांनी शेवटच्या षटकांत जोरदार पुनरागमन करत पाकिस्तानी फलंदाजांना नियमित अंतराने बाद केले.पाकिस्तानकडून उस्मान (१०७), कादिर (८०), युसूफ (६३) यांच्याशिवाय हयाम (२१), अहमद हुसेन (१७), निकाब शफीक (११), हमझा जहूर (१०) आणि मोहम्मद सायम (७) यांनी योगदान दिले. भारताकडून गोलंदाजीत काव्या पटेलने सर्वाधिक ४ गडी बाद केले, तर व्यंकटने ३ आणि अर्जुन राजपूतने १ बळी घेतला.

अखेरच्‍या षटकात भारताचा थरारक विजय

प्रत्युत्तरात ३३८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने दाखवलेले लढाऊ यश कौतुकास्पद ठरले. कर्णधार लक्ष्य राजेश रायचंदानी यांनी अत्यंत दमदार ८० धावांची आक्रमक खेळी केली. विशेष म्हणजे, सलामीवीर आर्यवीर सेहवान दुखापतग्रस्त असतानाही मैदानात उतरला आणि त्याने अत्यंत संयमित ५८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली.सामन्याच्या अखेरच्या षटकांमध्ये मनाल चौहान आणि मोहित उलवा यांनी मोक्याच्या वेळी चिवट व निर्णायक भागीदारी केली. अखेरच्‍या चेंडूवर मोहित उल्वाने चौकार फटकावत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.