

Kapil Dev On Yuvraj Singh: भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग यांचे वडील योगराज सिंग हे सतत कोणत्या ना कोणत्या तरी वादात अडकत असतात. त्यांनी १९८३ चे वर्ल्डकप विजेते माजी कर्णधार कपिल देव यांच्याबाबत देखील एक वादग्रस्त विधान केलं होतं. योगराजने कपिल देव यांच्यावर आरोप केला होता की नॉर्थ झोन आणि हरियाणा, भारताचे कर्णधार झाल्यावर कपिल देव यांनी त्यांना संघातून ड्रॉप केले होते.
कपिल देव यांनी आपलं आंतरराष्ट्रीय करिअर संपवल्याचा देखील आरोप योगराज सिंग करतात. एवढेच नाही तर कपिल देव यांच्यापेक्षा आपल्या मुलाकडे जास्त आयसीसी ट्रॉफी असल्याची शेखी देखील ते मिरवत असतात. अर्थात आपल्या वडिलांच्या या वक्तव्यांवर युवराज सिंगने जाहीर माफी देखील मागितली होती. आता यावर कपिल देव यांनी आपली बाजू मांडली आहे.
कपिल देव यांनी स्पोर्ट्स तकच्या पॉडकास्टमध्ये सांगितल की, 'युवराज सिंगला माफी मागण्याची गरज नाही. काही गोष्टी होतात. ते महान खेळाडू आहेत. तो एक शानदार खेळाडू होता. त्याने क्रिकेटला अजून प्रसिद्धी मिळवून दिली. माझ्याकडून त्याच्याबद्दल काहीच नाही. मात्र मला आयुष्यात कडवट स्वभावाच्या लोकांशी भेटणं आवडत नाही. मला आनंदी आणि जिंदादिल लोकं आवडतात.
कपिल देव पुढे म्हणतात, आयुष्यात काही गोष्टी होतात मात्र आपल्याला आयुष्यात पुढं जावं लागतं. जर कडवट स्वभावाचे लोकं आहात तर लोकं तुमच्यावर प्रेम करणार नाहीत. त्यांच्या मुलाने चांगली कामगिरी केली आहे. त्याबद्दल त्यांना आनंदी राहिलं पाहिजेय.
कपिल देव यांनी आयुष्यात तुम्हाला सर्व गोष्टी मिळत नाहीत. मात्र तुम्ही कडवट स्वभावाच्या व्यक्ती असू नये. जगात अशा लोकांसाठी कोणाकडेही स्थान नसते. तुमची प्रतिक्रिया ठरवते की तुम्ही कोण आहात. मी उठून शिवीगाळ आणि मारहाण केली तर काय होणार. तुम्हाला नेहमी पुढे जावं लागतं.
देशात असे किती लोक आहेत जे देशाकडून क्रिकेट खेळलेत आणि अभिनय देखील करतात. तुम्ही या दृष्टीकोणातून पाहिलं तर त्यांनी अनेकांपेक्षा जास्त कमवलं आहे. जर तुम्ही नाखुश आहात तर काही करू शकत नाही. ते माझे लहाणपणीचे मित्र आहेत. आमचे रस्ते वेगवगळे आहेत. मात्र आम्ही खूप चांगला वेळ एकत्र घालवला आहे. आयुष्य बदलत राहतं. आम्ही एकत्र वाढलो. तुम्ही चांगले दिवस विसरू नयेत.