John Abraham Buys Cricket Team: जॉन अब्राहमची देखील टी२० क्रिकेटमध्ये एन्ट्री; संघ खरेदी केला अन् क्लासेन देखील सोबत आला

John Abraham Buys Cricket Team
John Abraham Buys Cricket Teampudhari
Published on
Updated on

John Abraham Buys Cricket Team: बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहमने क्रिकेटच्या दुनियेत मोठं पाऊल टाकलं आहे. जॉन अब्राहमने युरोपियन टी २० प्रीमियर लीगमधील एख फ्रेंचायजी खरेदी केली आहे. जॉन अब्राहम आता ETPL मधील रॉटरडॅम डॉकर्सचा सहमालक झाला आहे. जॉन अब्राहम सोबतच आता क्रिकेट गजतातील दिग्गज जाँटी ऱ्होड्स, फाफ ड्युप्लेसिस, क्लासने आणि मॅनेजिंग पार्टनर म्हणून मधुकर श्री देखील सामील झाले आहेत.

John Abraham Buys Cricket Team
IPL 2026 Prize Money | गेल्या वेळच्या तुलनेत बक्षीस रक्कम वाढणार? विजेता आणि उपविजेत्या संघाला किती रुपये मिळणार?

जॉन टी २० लीगच्या मैदानात

युरोपियन टी २० प्रीमियर लीगचा पहिला हंगाम हा २६ ऑगस्ट ते २० सप्टेंबर या दरम्यान खेळला जाणार आहे. ही स्पर्धेत एकूण सहा शहरांचे संघ सहभागी होणार आहे. यात ग्लासगो, एम्स्ट्रेडॅम, एडिनबर्ग, डबलिंन, बेलफास्ट आणि रॉटरडॅम या शहरांच्या नावांचा समावेश आहे. संपूर्ण स्पर्धेत एकूण ३२ सामने खेळले जाणार आहेत.

या लीगचा उद्येश हा आयर्लंड, स्कॉटलँड आणि नीदरलँड्समधील क्रिकेट एका वेगळ्या उंचीवर घेऊण जाणे आणि या क्षेत्रातील क्रिकेटच्या विकासाला चालना देणे हा आहे. आयोजकांच्या म्हणण्यानुसार ही लीग युरोपात क्रिकेटच्या विस्तारात महत्वाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे.

John Abraham Buys Cricket Team
IPL 2026 Prize Money: RCB वर 20 कोटींचा वर्षाव! विराटला फक्त 5 लाख? वैभव सूर्यवंशीला किती लाख मिळाले? पुरस्कारांची संपूर्ण यादी

सहमालक जॉन

जॉन अब्राहम रटरडॅम संघात सहमालक झाल्यानंतर म्हणाला की, 'क्रिकेट लोकांना जोडणे, प्रेरित करणे आणि नव्या संधी उपलब्ध करून देण्याची क्षमता आहे. जॉनच्या मते युरोप सध्या क्रिकेटसाठी एक वेगाने वाढती बाजारपेठ आहे. रॉटरडॅम डॉकर्सकडे एक तगडे व्हिजन, नेतृत्व आणि मोठी महत्वकांक्षा आहे. यामुळं या फ्रेंचायजीची एक खास ओळख निर्माण होऊ शकते.

ETPL चे सह संस्थापन अभिषेक बच्चनने जॉन अब्राहमचे स्वागत करताना खेळाविषयी त्यांची पॅशन आणि स्पोर्ट्स बिजनेसमधील त्याचा अनुभव हा रॉटरडॅम डॉकर्ससाठी फायदेशीर होईल. जॉनच्या उपस्थितीत टीम आणि लीग दोन्ही एका वेगळ्या उंचीवर पोहचण्यास मदत होईल असं देखील मत अभिषेक बच्चनने व्यक्त केलं.

John Abraham Buys Cricket Team
IPL 2026 Prize Money | गेल्या वेळच्या तुलनेत बक्षीस रक्कम वाढणार? विजेता आणि उपविजेत्या संघाला किती रुपये मिळणार?

युरोपियन टी २० प्रीमियर लीग वेगवेगळ्या फ्रेंचायजींचा समुहात अनेक दिग्गज क्रिकेटपटूंची देखील भागीदारी आहे. यात स्टीव्ह वॉ, राहुल द्रविड, जाँटी ऱ्होड्स, मॅथ्यू हेडन, फाफ ड्युप्लेसिस आणि हेनरिक क्लासेन यासारखी मोठी नावे आहेत. त्यामुळं या लीगच्या पहिल्या हंगामासाठी क्रिकेट चाहते खूप उत्सुक आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news