Tendulkar vs Root : सचिन तेंडुलकरचा ऐतिहासिक विक्रम धोक्यात; अवघ्या ४८ धावा करताच जो रूट रचणार नवा इतिहास

Joe Root Test record : ओव्हल मैदानावर रंगणार ऐतिहासिक थरार; जो रूटच्या निशाण्यावर क्रिकेटच्या देवाचा 'हा' मोठा रेकॉर्ड!
ओव्हल मैदानावर रंगणार ऐतिहासिक थरार; जो रूटच्या निशाण्यावर क्रिकेटच्या देवाचा 'हा' मोठा रेकॉर्ड!
Joe Root vs Sachin Tendulkar Root Needs 48 Runs To Break Tendulkar s Historic Test Record
Published on
Updated on

लंडन : इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूट कसोटी क्रिकेटमध्ये एक नवा इतिहास रचण्याच्या अगदी उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या भारतरत्न सचिन तेंडुलकरचा एक मोठा आणि ऐतिहासिक विक्रम मोडीत काढणे आता जो रूटच्या निशाण्यावर आहे. या विक्रमी कामगिरीमुळे क्रिकेट जगतात सध्या जो रूटच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.

सध्या इंग्लंडच्या मैदानावर यजमान इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकून इंग्लंडने आधीच आघाडी घेतली असून, दुसरा कसोटी सामना १७ जूनपासून सुरू झाला आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडच्या संघाने ७ गड्यांच्या मोबदल्यात २७७ धावांपर्यंत मजल मारली. आता दुसऱ्या दिवशी जास्तीत जास्त धावा फलकावर लावण्याचा किवी संघाचा प्रयत्न असेल.

तेंडुलकरचा 'तो' मोठा विक्रम मोडीत निघणार?

लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर खेळवल्या जात असलेल्या या अत्यंत महत्त्वाच्या कसोटी सामन्यात जो रूट संघाचे नेतृत्व करत आहे. यादरम्यान कर्णधार रूटचे लक्ष केवळ विजयावरच नाही, तर एका महाविक्रमावर केंद्रित झाले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने नवनवीन शिखरे पादाक्रांत करणाऱ्या रूटला सचिन तेंडुलकरचा एक मोठा रेकॉर्ड उद्ध्वस्त करण्याची सुवर्णसंधी आहे. या दुसऱ्या कसोटी सामन्यात जो रूटने अवघ्या ४२ धावा पूर्ण करताच तो सचिन तेंडुलकरला मागे टाकत कसोटी क्रिकेटमध्ये एका विशेष विक्रमाची नोंद करेल, तर १४ हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी त्याला केवळ ४८ धावांची आवश्यकता आहे.

कसोटी क्रिकेटच्या प्रदीर्घ इतिहासात १४,००० धावांचा टप्पा गाठणारा जो रूट हा जगातील दुसरा फलंदाज ठरण्यापासून अवघा काही पावले दूर आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या डावात ४८ धावा करताच कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद १४ हजार धावा पूर्ण करणारा तो जगातील एकमेव फलंदाज बनेल. यामुळे सचिन तेंडुलकरचा अनेक वर्षांपासून अबाधित असलेला विक्रम मोडीत निघेल. जो रूटने आतापर्यंत १६४ कसोटी सामन्यांच्या ३०० डावांमध्ये १३,९५२ धावा केल्या आहेत. त्यामुळे आपल्या १६५ व्या कसोटीत तो १४ हजारी मनसबदार बनू शकतो. विशेष म्हणजे, सचिन तेंडुलकरला हा टप्पा गाठण्यासाठी १७१ कसोटी सामने आणि २७९ डाव खेळावे लागले होते, म्हणजेच रूट हा टप्पा अत्यंत जलद गतीने गाठणार आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज:

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सध्या सचिन तेंडुलकर १५,९२१ धावांसह अव्वल स्थानावर आहे. त्यापाठोपाठ जो रूट १३,९५२ धावांसह दुसऱ्या, ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग १३,३७८ धावांसह तिसऱ्या, दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस १३,२८९ धावांसह चौथ्या आणि भारताचा 'द वॉल' राहुल द्रविड १३,२८८ धावांसह पाचव्या स्थानावर विराजमान आहे.

इतर अनेक विक्रमांनाही गवसणी घालण्याची संधी

१४,००० धावांच्या मैलाच्या दगडाव्यतिरिक्त जो रूटकडे न्यूझीलंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये २,००० धावा पूर्ण करणारा जगातील पहिला फलंदाज बनण्याचा मान मिळवण्याचीही मोठी संधी आहे. २०१२ मध्ये कसोटी पदार्पण करणाऱ्या रूटने किवी संघाविरुद्ध २२ सामन्यांत १,९३४ धावा केल्या आहेत. हा २,००० धावांचा आकडा गाठण्यासाठी त्याला केनिंग्टन ओव्हल कसोटीत ६६ धावांची गरज आहे.

तसेच, सर्व आंतरराष्ट्रीय फॉरमॅटचा (कसोटी, वन-डे, टी-२०) विचार केला तर रूटने न्यूझीलंडविरुद्ध ५४ सामन्यांत ३,१०६ धावा केल्या आहेत. या सामन्यात त्याने किमान ६२ धावा केल्यास, तो किवी संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत भारताचा विराट कोहली (३,१६७ धावा) आणि रिकी पाँटिंग (३,१४५ धावा) यांना मागे टाकून थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेईल. या यादीतही न्यूझीलंडविरुद्ध ६६ सामन्यांच्या ८० डावांत ३,३४५ धावा फटकावून सचिन तेंडुलकरच अव्वल स्थानावर कायम आहे. त्यामुळे या ऐतिहासिक सामन्यात जो रूटच्या बॅटमधून किती धावा निघतात आणि तो किती विक्रम आपल्या नावावर करतो, याकडे संपूर्ण क्रीडा जगताचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news