Jay Shah ICC Chairman : 'आयसीसी'वर भारताचे वर्चस्व अबाधित, जय शहा यांची अध्यक्षपदी पुन्हा बिनविरोध निवड

Jay Shah re-elected ICC Chairman : जगभरात क्रिकेटच्या हितासाठी कटिबद्ध असल्याचा जय शहा यांचा पुनरुच्चार
Jay Shah re-elected ICC Chairman
जय शहा यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) अध्यक्षपदी पुन्हा एकदा बिनविरोध निवड झाली आहे. Pudhari News
Published on: 
Updated on: 

Jay Shah re-elected ICC Chairman : जय शहा यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) अध्यक्षपदी पुन्हा एकदा बिनविरोध निवड झाली आहे. बाली येथे झालेल्या बोर्ड आणि समितीच्या बैठकांमध्ये आयसीसी संचालकांनी मांडलेल्या प्रस्तावानंतर हा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी २०२४ मध्‍ये जय शहा हे आयसीसीच्या इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष ठरले होते. आता पुढील दोन वर्ष त्‍यांच्‍याकडे आंतरराष्‍ट्रीय क्रिकेट परिषदेचे नेतृत्त्‍व राहणार आहे.

माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाने सन्मानित : जय शहा

निवेदनात जय शहा यांनी म्हटलं आहे की, "आयसीसी बोर्डाने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाने मी सन्मानित झालो आहे. सर्व संचालकांच्या विश्वास आणि पाठिंब्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आयसीसीचे अध्यक्ष म्हणून काम करणे ही एक मोठी जबाबदारी आणि विशेषाधिकार दोन्ही आहे. जगभरात क्रिकेटच्या हितासाठी आमच्या सदस्यांसोबत काम करण्यास मी कटिबद्ध आहे."

Jay Shah re-elected ICC Chairman
Harmanpreet Kaur Jay Shah: ट्रॉफी स्विकारताना हरमन जय शहांच्या पाया पडली? पाहा ICC अध्यक्षांनी काय केलं

स्पर्धांचे आयोजन करण्यापलीकडे आपली जबाबदारी

क्रिकेट खेळाच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि रोमांचक कालखंडात आपण प्रवेश करत आहोत. 'एलए २८' (LA28) ऑलिम्पिक खेळांमध्ये क्रिकेटचे पुनरागमन ही खेळाडू आणि प्रेक्षकांसाठी सुवर्णसंधी आहे. केवळ स्पर्धांचे आयोजन करण्यापलीकडे आपली जबाबदारी आहे. आपल्याला चाहत्यांवर, खेळाडूंवर, व्यावसायिक भागीदारांवर आणि इतर महत्त्वाच्या भागधारकांवर लक्ष केंद्रित करून या खेळासाठी अधिक मजबूत आणि शाश्वत भविष्य घडवायचे आहे, असेही शहा यांनी नमूद केले.

Jay Shah re-elected ICC Chairman
kapil dev : ‘इतर खेळाडूंनाही यातून प्रेरणा मिळेल’; भुवनेश्वर कुमारच्या पुनरागमनावर कपिल देव नेमकं काय म्हणाले?

२०२४ मध्ये जय शहा यांची झाली होती बिनविरोध निवड

जय शहा यांची २०२४ मध्ये पहिल्यांदा आयसीसी अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती. त्यांनी ग्रेग बार्कले यांच्याकडून ही जबाबदारी स्वीकारली होती. बार्कले यांनी तिसऱ्या कार्यकाळासाठी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता.

Jay Shah re-elected ICC Chairman
Sunil Gavaskar : "टीम इंडियाने त्‍याचा पर्याय शोधणे...." : हार्दिक पांड्याबाबत सुनील गावस्‍कर नेमकं काय म्‍हणाले?

आयसीसीच्या इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष

जय शहा हे आयसीसीच्या इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष ठरले आहेत. जगमोहन दालमिया, शरद पवार, एन. श्रीनिवासन आणि शशांक मनोहर यांच्यानंतर, आयसीसीचे प्रमुखपद भूषवणारे ते पाचवे भारतीय आहेत. ३८ वर्षीय शहा यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) मानद सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. २०१९ मध्ये, शहा यांची बीसीसीआयच्या इतिहासातील सर्वात तरुण मानद सचिव म्हणून निवड झाली होती.

Jay Shah re-elected ICC Chairman
IND vs AUS : भारताच्‍या पराभवानंतर गावस्‍कर DLS वर संतापले, VJD चे केले समर्थन! जाणून घ्‍या BCCI अवलंब करत असणारी प्रणाली

शहा यांच्या कार्यकाळात भारतीय क्रिकेटमध्ये घडल्या महत्त्वपूर्ण घडामोडी

जय शहा यांनी २००९ मध्ये जिल्हा क्रिकेट असोसिएशनमधून आपला प्रवास सुरू केला. यानंतर ते गुजरात क्रिकेट असोसिएशनमध्ये कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात भारतीय क्रिकेटमध्ये आयपीएल (IPL) मीडिया हक्कांचा विक्रमी करार, महिला प्रीमियर लीगची (WPL) सुरुवात, अत्याधुनिक 'सेंटर ऑफ एक्सलन्स'ची स्थापना आणि कसोटी क्रिकेट प्रोत्साहन योजना सुरू करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.