India Vs West Indies: सगळे संजू संजू करत आहेत मात्र ज्यांना क्रिकेट कळतं... सामना कुठं फिरला? बुमराहनं थेटच सांगितलं

India Vs West Indies
India Vs West Indiespudhari photo
Published on
Updated on

India Vs West Indies: भारतानं वेस्ट इंडीजचा 5 विकेट्सने पराभव करत सेमी फायनल गाठली. वेस्ट इंडीजनं भारतासमोर १९६ धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. हे आव्हान भारतानं ५ फलंदाजांच्या मोबदल्यात. १९.२ षटकात पार केलं. या विजयात नाबाद ९७ धावा करणाऱ्या संजू सॅसमनचा सिंहाचा वाटा होता. त्याने ५० चेंडूत ९७ धावांची खेळी केली. यात १२ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता.

ते दोन चौकार

भारताच्या विजयानंतर संजू सॅमसनचे देशभरातून कौतुक होत आहे. भारतानं टी २० वर्ल्डकपच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढी मोठी धावसंख्या चेस करण्यात आली. दरम्यान, सामन्याचा हिरो जरी संजू सॅमसन ठरला असली तरी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या मते संजूची इनिंग नसून शेवटच्या षटकात मारण्यात आलेले दोन चौकर सामन्याचा टर्निंग पॉईंट आहे.

तर शेवटच्या षटकात दबाव आला असता

जसप्रीत बुमराह मुलाखतीत म्हणाला की, 'दुबेने जे दोन चौकार मारले ते सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरले. क्रिकेटच्या पुस्तकात, स्टॅटनुसार या दोन चौकारांचे कोणीही कौतुक करणार नाही. मात्र ज्या लोकांना खरोखर क्रिकेट कळतं ते या दोन चौकारांचे कौतुक करतील. कारण या दोन चौकारांमुळेच शेवटच्या षटकात आमच्यावर दबाव निर्माण होऊ दिला नाही.'

हार्दिक पांड्या आऊट झाला अन्...

शिवम दुबेबद्दल बोलायचं झालं तर वेस्ट इंडीज विरूद्धच्या सामन्यात १९ व्या षटकात सेट झालेला हार्दिक पांड्या बाद झाला. त्यावेळी भारताला ११ चेंडूत १७ धावांची गरज होती. पांड्या बाद झाल्यामुळं नवीन फलंदाज म्हणजेच शिवम दुबे हा सेट होण्यासाठी काही चेंडू घेण्याची शक्यता दाट होती. जर त्यानं ते चेंडू घेतले असते तरी शेवटच्या षटकात भारतासमोर जास्त धावांचे आव्हान असते.

मात्र शिवम दुबेने १९ व्या षटकात तिसऱ्या चेंडूवर आल्या आल्या चौकार मारत दबाव पुन्हा वेस्ट इंडीजच्या गोलंदाजावर टाकला. त्यानं षटकाच्या पाचव्या चेंडूवर देखील चौकार मारला. आणि शेवटच्या चेंडूवर लेग बाईजच्या दोन धावा मिळवल्या. यामुळं भारताला शेवटच्या षटकात फक्त ६ चेंडूत ७ धावा करायच्या होत्या. त्या धावा संजूनं दोन चेंडूत चौकार आणि षटकार मारत पूर्ण केल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news