IPL Auction 2026 : वाचा Sold And Unsold सर्व खेळाडूंची संपूर्ण यादी, जाणून घ्या मूळ किंमत आणि खरेदी
कॅमेरुन ग्रीन ठरला सर्वात महागडा विदेशी खेळाडू
भारताचे युवा क्रिकेटपटू प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मावर प्रत्येकी १४.२० कोटींची बोली
डेव्हन कॉनवेसह जॅक फ्रेझर-मॅकगर्क राहिले अनसोल्ड
IPL Auction 2026 :
अबुधाबी : इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२६ चा लिलाव मंगळवारी (दि.१६) दिमाखात पार पडला. या लिलावात केवळ आंतरराष्ट्रीय तारेच नाही, तर अनकॅप्ड भारतीय खेळाडूंनीही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कोलकता नाईट रायडर्सने (KKR) ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरून ग्रीनला २५.२० कोटी रुपयांना खरेदी केले. तो कोणत्याही फ्रँचायझी स्पर्धेतील सर्वात महागडा विदेशी खेळाडू ठरला आहे. चेन्नई सुपर किंग्सने (CSK) प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा या युवा खेळाडूंवर प्रत्येकी १४.२० कोटी रुपयांची विक्रमी बोली लावली. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथीशा पाथिराणा याला केकेआरने १८ कोटी रुपयांना आपल्या ताफ्यात सामील केले.
१० संघांनी ७७ खेळाडूंवर खर्च केले २१५.४५ कोटी
इंडियन प्रीमियर लीग (IPL)च्या मिनी लिलावात १० संघांनी एकूण ७७ खेळाडूंवर २१५.४५ कोटी रुपये खर्च केले. आयपीएलचा पुढील हंगाम २६ मार्च ते ३१ मे दरम्यान खेळवला जाणार आहे.
महत्त्वाच्या खेळाडूवर कोट्यवधींची बोली
कोलकता नाईट रायडर्स (KKR): रचिन रवींद्र (२ कोटी), फिन ॲलन (२ कोटी), आकाश दीप (१ कोटी), मुस्तफिजुर रहमान (९.२ कोटी).
चेन्नई सुपर किंग्स (CSK): मॅट हेन्री (२ कोटी), अकील हुसेन (२ कोटी), झॅकरी फोक्स (७५ लाख).
मुंबई इंडियन्स (MI): क्विंटन डी कॉक (१ कोटी), दानिश मालेवार (३० लाख), मयंक रावत (३० लाख).
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB): जेकब डफी (२ कोटी), विकी ओस्तवाल (३० लाख), विहान मल्होत्रा (३० लाख).
पुनरागमन केलेले खेळाडू
पृथ्वी शॉ: सुरुवातीला दोनदा न विकल्या गेलेल्या पृथ्वीला तिसऱ्या फेरीत दिल्ली कॅपिटल्सने ७५ लाख रुपयांच्या मूळ किमतीत पुन्हा विकत घेतले.
सरफराज खान: पहिल्या फेरीत अनसोल्ड राहिल्यानंतर सीएसकेने ७५ लाखांत खरेदी केले.
डेव्हिड मिलर: दिल्ली कॅपिटल्सने २ कोटी रुपयांना खरेदी केले.
क्विंटन डी कॉक: मुंबई इंडियन्सने १ कोटीच्या मूळ किमतीत आपल्या ताफ्यात घेतले.
अनसोल्ड राहिलेले खेळाडू
जॅक फ्रेझर-मॅकगर्क: दोनदा बोली लावूनही कोणीही खरेदी केले नाही
डेव्हन कॉनवे या अनुभवी खेळाडूला कोणताही खरेदीदार मिळाला नाही.
दीपक हुडा: तीन वेळा बोली लावूनही अनसोल्ड राहिला.

