IPL 2027 Auction in India : आयपीएल २०२७ चा लिलाव भारतात होणार, इम्पॅक्ट प्लेअर' नियमावरही बीसीसीआयचा पुनर्विचार

गेल्या तीन वर्षांनंतर लिलाव देशात परतण्याची शक्यता, रोहित शर्मा-शुभमन गिलसह प्रमुख खेळाडूंचा 'इम्पॅक्ट प्लेअर' नियमाला विरोध कायम
IPL 2027 Auction in India : आयपीएल २०२७ चा लिलाव भारतात होणार, इम्पॅक्ट प्लेअर' नियमावरही बीसीसीआयचा पुनर्विचार
Published on
Updated on

मुंबई : आयपीएल २०२७ चा खेळाडूंचा लिलाव यंदा भारतातच आयोजित केला जाण्याची दाट शक्यता आहे. लीगचे अध्यक्ष अरुण धुमाळ यांनी गेल्या तीन वर्षांपासून परदेशात होणारा हा कार्यक्रम यंदा भारतात आणण्यासंदर्भात उत्सुकता दर्शवली आहे.

गेल्या तीन आवृत्तींचे लिलाव दुबई, जेद्दा (मेगा लिलाव) आणि अबू धाबी येथे पार पडले होते. याविषयी बोलताना अरुण धुमाळ म्हणाले, "दरवर्षी आम्ही भारतात लिलाव घेण्याचा प्रयत्न करतो, मात्र लग्नसराईच्या दाट हंगामामुळे आम्हाला योग्य ठिकाण (वेन्यू) मिळण्यात अडचण येते. यंदा हा छोटा लिलाव (मिनी ऑक्शन) असल्यामुळे आम्हाला नक्कीच योग्य ठिकाण मिळेल आणि लिलाव भारतातच होईल, अशी आशा आहे."

IPL 2027 Auction in India : आयपीएल २०२७ चा लिलाव भारतात होणार, इम्पॅक्ट प्लेअर' नियमावरही बीसीसीआयचा पुनर्विचार
Asian Games Team India Trouble : एशियन गेम्सपूर्वी टीम इंडियाला मोठा झटका! स्टार खेळाडू स्पर्धेबाहेर! युवा खेळाडूला थेट एन्ट्री

दरम्यान, बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये धुमाळ यांची आयपीएल अध्यक्षपदी फेरनिवड होणे अपेक्षित असून, लिलावाचे यजमान शहर बीसीसीआयच्या पसंतीच्या ठिकाणाच्या उपलब्धतेवर ठरवले जाईल.

'इम्पॅक्ट प्लेअर' नियमावर फेरविचार सुरू

नुकत्याच झालेल्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत २०२७ पर्यंत लागू असणाऱ्या 'इम्पॅक्ट प्लेअर' नियमावरही सखोल चर्चा करण्यात आली. बीसीसीआयने या नियमावर सर्व संघांकडून नवीन अभिप्राय मागवले आहेत. हा रणनीतिक नियम संघांना सामन्याच्या कोणत्याही टप्प्यावर खेळाडू बदलण्याची (सबस्टिट्यूट) मुभा देतो.मात्र, या नियमामुळे अष्टपैलू खेळाडूंच्या भूमिकेला आणि कौशल्याला मर्यादा पडत असल्याचा आक्षेप अनेक दिग्गज खेळाडूंनी घेतला आहे. या खेळाडूंमध्ये भारताचे वन डे आणि कसोटी कर्णधार शुभमन गिल, माजी कर्णधार रोहित शर्मा, स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांचा समावेश आहे.

IPL 2027 Auction in India : आयपीएल २०२७ चा लिलाव भारतात होणार, इम्पॅक्ट प्लेअर' नियमावरही बीसीसीआयचा पुनर्विचार
ICC Rankings : आयसीसी क्रमवारीत टीम इंडियाचा डंका! अभिषेक 'नंबर 1'वर भक्कम, तर सूर्याची टॉप १० मध्ये वादळी झेप

इम्‍पॅक्‍ट प्‍लेयर नियम रद्द करण्‍याची मागणी

आगामी हंगामापूर्वी बहुतांश कर्णधारांनी या नियमाबाबत आपली नाराजी व्यक्त केली असून, तो रद्द करण्याची मागणी जोर धरत आहे. यावर प्रतिक्रिया देताना, बीसीसीआय या नियमाचा पुनर्विचार करण्यास तयार असल्याचे धुमाळ यांनी स्पष्ट केले असून सर्व संलग्‍न घटकांचा अभिप्राय घेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी नमूद केले. बीसीसीआयच्या या आगामी बैठकीत अरुण धुमाळ यांच्यासह खैरुल मजुमदार यांचीही आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलवर फेरनिवड होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news