Angkrish Raghuvanshi fine | बाद झाल्यावर बॅटवर काढला राग अन् IPLने थेट खिसा केला रिकामा! 'केकेआर'च्‍या रघुवंशीला दंड

Angkrish Raghuvanshi fine | रघुवंशीच्‍या खात्‍यावर एक डिमेरिट पॉईंटही जमा
Angkrish Raghuvanshi fine
लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात रघुवंशीला क्षेत्ररक्षणात अडथळा आणण्‍याच्‍या नियमांतर्गत बाद ठरविण्‍यात आले.Pudhari
Published on
Updated on
Summary

पंचाच्‍या निर्णयावर नाराज झालेल्या रघुवंशीने रागाच्या भरात सीमारेषेवरील कुशनवर बॅट मारली आणि डगआऊटमध्ये आपले हेल्मेट जोरात फेकून दिले होते.

Angkrish Raghuvanshi fine

नवी दिल्ली : लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात आयपीएल आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल कोलकाता नाईट रायडर्सचा फलंदाज अंगक्रिश रघुवंशीला मॅच फीच्या २०% दंड ठोठावण्यात आला आहे. त्याच्या खात्यात एक डिमेरिट पॉईंट देखील जमा झाला आहे.

मैदानात काय घडलं?

लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात रघुवंशीला क्षेत्ररक्षणात अडथळा आणण्‍याच्‍या नियमांतर्गत बाद ठरविण्‍यात आले. पंचाच्‍या निर्णयावर नाराज झालेल्या रघुवंशीने रागाच्या भरात सीमारेषेवरील कुशनवर बॅट मारली आणि डगआऊटमध्ये आपले हेल्मेट जोरात फेकून दिले होते.

Angkrish Raghuvanshi fine
IPL 2026 KKR vs PBKS: दिला एक पॉईंट... पंजाबींचे ह्रदय खूप मोठे म्हणत श्रेयस अय्यरच्या बहिणीने केकेआरची चांगलीच खेचली

आचारसंहितेच्या 'लेव्हल १' मधील नियमांचे उल्लंघन

आयपीएलने आपल्‍या निवेदनात म्हटले आहे की, "कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू अंगक्रिश रघुवंशी याने लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या ३८ व्या सामन्यात आचारसंहितेच्या 'लेव्हल १' मधील नियमांचे उल्लंघन केले आहे. यासाठी त्याला मॅच फीच्या २०% दंड आणि एक डिमेरिट पॉईंट देण्यात आला आहे."

Angkrish Raghuvanshi fine
IPL 2026 | 'माझ्याकडे उत्तरं नाहीत... कोणतंही कारण नाही': लखनौच्या पराभवाच्या 'चौकारा'नंतर ऋषभ पंत नेमकं काय म्हणाला?

रघुवंशीने केली चूक मान्य

रघुवंशीने आचारसंहितेच्या कलम २.२ चे उल्लंघन केले आहे. 'क्रिकेटचे साहित्य, मैदानावरील उपकरणे किंवा फिक्स्चरचा गैरवापर' करण्याशी या प्रकार संबंधित आहे. ५ व्या षटकात बाद झाल्यानंतर त्याने दाखवलेल्या आक्रमक वर्तणुकीमुळे ही कारवाई करण्यात आली. रघुवंशीने आपली चूक मान्य केली असून ही शिक्षा स्वीकारली असल्‍याचेही आयपीएलने आपल्‍या निवेदनात नमूद केले आहे.

Angkrish Raghuvanshi fine
IPL 2026 : ऋतुराज, बुमराह, सूर्या अन् रिंकू... ज्यांच्या जीवावर मारत होते उड्या; त्याच 'दिग्गजांनी' संघांना पोहचवलं रसा तळाला

अत्‍यंत रोमहर्षक सामन्‍यात कोलकाता नाईट रायडर्सची बाजी

रविवारी (२६) लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सचा सामना अत्यंत थरारक झाला. केकेआरची सुरुवात खराब झाली होती, मात्र रिंकू सिंगने नाबाद ८३ धावांची खेळी करत संघाला सावरले. शेवटच्या चेंडूवर षटकार मारून लखनौने सामना टाय केला होता. दोन्ही संघांनी १५५ धावा केल्यामुळे सामना 'सुपर ओव्हर' मध्ये पोहोचला. सुपर ओव्हरमध्ये केकेआरने बाजी मारली आणि रिंकू सिंगला 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरवण्यात आले.

Angkrish Raghuvanshi fine
Jasprit Bumrah IPL 2026 | पाच सामन्यांनंतरही जसप्रीत बुमराहची विकेटची पाटी कोरीच! माजी क्रिकेटपटू आर. अश्विनने सांगितले कारण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news