IPL 2026: IPL मध्ये मोठा ट्विस्ट! 'हा' खेळाडू RCB सोडून CSK मध्ये जाणार?अश्विनच्या पोस्टमुळे खळबळ

IPL 2026 CSK Replacement: CSK संघाला आयुष म्हात्रेच्या दुखापतीमुळे मोठा धक्का बसला आहे. रविचंद्रन अश्विनने RCB खेळाडूला लोनवर घेण्याचा सल्ला दिला आहे.
IPL 2026 CSK Replacemen
IPL 2026 CSK ReplacemenPudhari
Published on
Updated on

IPL 2026 CSK Replacement: IPL 2026 स्पर्धा सुरू असतानाच चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाला मोठा धक्का बसला आहे. युवा फलंदाज आयुष म्हात्रे दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर पडला असून, त्यामुळे संघाला आता त्याचा पर्याय शोधावा लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे नव्या चर्चांना उधाण आलं आहे.

सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात आयुष म्हात्रेला डाव्या पायाला दुखापत झाली. ही दुखापत गंभीर असल्याने तो उर्वरित हंगामात खेळू शकणार नाही. आधीच काही खेळाडू दुखापतीमुळे बाहेर असल्याने CSK साठी ही आणखी एक अडचण आहे. कर्णधार एम.एस. धोनी देखील पूर्णपणे फिट नसल्याने संघाचा समतोल बिघडलेला दिसतो.

IPL 2026 CSK Replacemen
Ayush Mhatre: CSK ला मोठा धक्का! दुखापतीमुळे आयुष म्हात्रे IPL मधून बाहेर; आत 'या' खेळाडूची एन्ट्री होणार

दरम्यान, अश्विनने IPL मधील ‘लोन नियम’ (Loan Rule) वापरण्याचा सल्ला दिला आहे. त्याच्या मते, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघातील युवा खेळाडू विहान मल्होत्रा याला CSK मध्ये लोनवर घेणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. विशेष म्हणजे, विहानने अद्याप IPL 2026 मध्ये एकही सामना खेळलेला नाही, त्यामुळे तो या नियमांत बसू शकतो.

अश्विनने पर्याय म्हणून अभिज्ञान कुंडूचेही नाव सुचवले आहे. हे दोन्ही खेळाडू अलीकडेच अंडर-19 विश्वचषक जिंकलेल्या भारतीय संघाचा भाग होते. त्यांना भविष्याचा विचार करून संधी दिली जाऊ शकते, असेही अश्विनने म्हटले आहे.

IPL 2026 CSK Replacemen
One8 Commune Closure: कोर्टाच्या आदेशानंतर विराट कोहलीच्या रेस्टॉरंटला लागलं टाळं; नेमकं काय घडलं?

IPL च्या ‘लोन नियमां’नुसार, स्पर्धेच्या सुरुवातीच्या काही सामन्यांमध्येच एखादा खेळाडू दुसऱ्या संघाकडून लोनवर घेता येतो. मात्र, त्यासाठी अट अशी आहे की त्या खेळाडूने चालू हंगामात एकही सामना खेळलेला नसावा. तसेच तो खेळाडू पुढे आपल्या मूळ संघाविरुद्ध खेळू शकत नाही. आता CSK व्यवस्थापन कोणता निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news