Akash Deep injury
वेगवान गोलंदाज आकाश दीप.

IPL 2026 | आकाश दीप आयपीएलमधून बाहेर; कोलकाता नाईट रायडर्सच्या अडचणीत वाढ

आकाश दीपच्या अनुपस्थितीमुळे केकेआरला आता बदली खेळाडू शोधावा लागणार
Published on

IPL 2026 Akash Deep ruled out

कोलकाता : कोलकाता नाईट रायडर्स (KKR) समोरील वेगवान गोलंदाजीच्या समस्या संपण्याचे नाव घेत नाहीत. हर्षित राणा आणि मथीशा पाथिराणा (ज्याला अद्याप श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डाकडून परवानगी मिळालेली नाही) यांच्यानंतर आता वेगवान गोलंदाज आकाश दीप देखील आयपीएल २०२६ मधून बाहेर पडला असल्‍याचे वृत्त 'क्रिकबझ'ने दिले आहे.

आकाश दीप या हंगामात खेळू शकणार नाही...

कोलकाता नाईट रायडर्सच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, "दुर्दैवाने, आकाश दीप या हंगामात खेळू शकणार नाही, तो आयपीएलमधून बाहेर पडला आहे." बंगालच्या या २९ वर्षीय गोलंदाजाला गेल्या वर्षी अबू धाबी येथे झालेल्या मिनी-लिलावात केकेआरने १ कोटी रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केले होते.१८ मार्चपासून कोलकाता येथे सुरू झालेल्या केकेआरच्या सराव शिबिरात आकाश अद्याप रुजू झालेला नाही. तो सध्या बेंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सलन्स मध्ये पुनर्वसन प्रक्रियेतून जात आहे. त्याच्या दुखापतीचे नेमके स्वरूप अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र CoE व्यवस्थापनाने याबद्दल फ्रँचायझीला कल्पना दिली आहे.

Akash Deep injury
IPL 2026 : ३ कोटींचा अष्टपैलू IPL मधून बाहेर, सनरायझर्स हैदराबादला मोठा झटका

वारंवार होणाऱ्या दुखापतींचा अडसर

आकाश दीपसाठी दुखापतींचे सत्र नवीन नाही. २०२२ मध्ये आयपीएल पदार्पण केल्यापासून, चार हंगामांत तो केवळ १४ सामने खेळू शकला. त्याने १० बळी घेतले आहेत. गेल्या वर्षी तो ८ कोटी रुपयांच्या मोठ्या रकमेसह लखनऊ सुपर जायंट्सचा भाग होता, मात्र एका हंगामानंतर त्याला संघातून मुक्त करण्यात आले होते.

Akash Deep injury
IPL 2026 Captains List: कोण करणार मुंबई, चेन्नई, आरसीबीचे नेतृत्व? IPL 2026च्या कर्णधारांची संपूर्ण यादी

बदली खेळाडूचा शोध सुरू

आकाशच्या अनुपस्थितीमुळे केकेआरला आता बदली खेळाडू शोधावा लागणार आहे. गुडघ्याच्या शस्त्रक्रियेमुळे बाहेर पडलेल्या हर्षित राणाच्या जागी अद्याप कोणीही खेळाडू निवडलेला नाही. राणाच्या दर्जाचा योग्य पर्याय उपलब्ध नसल्याचे संघाचे मत होते. शुक्रवारी केकेआरचे मुख्य प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी बदली खेळाडू घेण्याचे संकेत दिले होते. नायर म्हणाले, "येत्या एक-दोन दिवसांत आम्ही निर्णय घेऊ. हर्षित सध्या बीसीसीआयच्या देखरेखीखाली आहे. वैद्यकीय पथकाकडून अहवाल मिळाल्यावर आम्ही परिस्थितीचे मूल्यमापन करू आणि मुंबईला रवाना होण्यापूर्वी अधिकृत घोषणा करू."

Akash Deep injury
IPL 2026 च्या वेळापत्रकाबाबत मोठी अपडेट; 2 टप्प्यांत होणार घोषणा! निवडणुकांच्या 'गुगली'वर BCCIचा मास्टरस्ट्रोक

केकेआरच्‍या गोलंदाजीची बाजू कमकुवत?

हंगाम सुरू होण्यापूर्वीच केकेआरच्या गोलंदाजीची चिंता वाढली आहे. संघाने मथीशा पाथिराणा याच्यावर १८ कोटींची मोठी बोली लावली होती; पण त्याला अद्याप श्रीलंकेकडून एनओसी मिळालेली नाही. तो किमान सुरुवातीचे काही सामने मुकण्याची शक्यता आहे. सध्या केकेआरकडे वैभव अरोरा, उमरान मलिक आणि कार्तिक त्यागी हे भारतीय वेगवान गोलंदाज उपलब्ध आहेत. तसेच, संघ व्यवस्थापन अष्टपैलू कॅमेरून ग्रीनचा वापर काही षटकांसाठी करू शकते. केकेआरचा पहिला सामना २९ मार्च रोजी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news