IPL 2025 Uncapped Player : 4 कोटींच्या अनकॅप्ड फलंदाजाने IPLमध्ये घातला धुमाकूळ, टीम इंडियासाठी ठोकली दावेदारी

टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करणे हे प्रत्येक क्रिकेटरचे स्वप्न असते. प्रभसिमरन सिंग हा देखील याच पंक्तीतला. त्याच्या कामगिरीत सातत्य दिसून येते. यावेळी त्याची फलंदाजीची सरासरी आणि स्ट्राईक रेट देखील उत्कृष्ट राहिला आहे.
ipl 2025 punjab kings prabhsimran singh
Published on
Updated on

ipl 2025 uncapped player prabhsimran singh punjab kings

नवी दिल्ली : पंजाब किंग्जचा संघ इंडियन प्रीमियर लीग 2025 मध्ये चमकदार कामगिरी करत आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली, पंजाब किंग्जने या हंगामात आतापर्यंत 11 पैकी 7 सामने जिंकले आहेत. पंजाब किंग्ज सध्या पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. जर पंजाब किंग्जने असाच खेळ कायम ठेवला तर कदाचित यावेळी आयपीएलमधील त्यांचा जेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात येऊ शकेल.

...पंजाबचा हा खेळाडू खूप धावा करत आहे.

पंजाब किंग्जच्या या शानदार कामगिरीत सलामीवीर प्रभसिमरन सिंगने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. प्रभसिमरनने आतापर्यंत 10 डावांमध्ये 39.72 च्या सरासरीने 437 धावा केल्या आहेत. या काळात, प्रभसिमरनचा स्ट्राईक रेट 170.03 राहिला आहे. या दरम्यान त्याच्या बॅटमधून अर्धशतके झळकली आहेत. यापैकी तीन अर्धशतके गेल्या तीन डावात झाली आहेत. याचा अर्थ 24 वर्षीय प्रभसिमरन या हंगामात पूर्ण फॉर्ममध्ये दिसत आहे. तो चालू हंगामात अनकॅप्ड खेळाडूंमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. यासोबतच, प्रभसिमरन हा या हंगामात पंजाब किंग्जकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू देखील आहे.

ipl 2025 punjab kings prabhsimran singh
Singer Parashar Joshi IPL Umpire : इंडियन आयडॉलचा गायक गाजवतोय IPLचे मैदान! CSKच्या सामन्यातील ‘पराशर’च्या पंचगिरीची जोरदार चर्चा

2019 च्या आयपीएल हंगामात प्रभसिमरन सिंग 60 लाख रुपयांना पंजाब किंग्जमध्ये सामील झाला. त्यानंतर 2022 च्या लिलावात पंजाब किंग्जने त्याला पुन्हा 60 लाख रुपयांना खरेदी केले. तर आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी, प्रभसिमरनला पंजाब किंग्जने 4 कोटी रुपयांना कायम ठेवले होते. प्रभसिमरन सिंग 2023 च्या आयपीएल हंगामात दिल्ली कॅपिटल्स (डीसी) विरुद्ध 65 चेंडूत 103 धावा काढून प्रसिद्धीच्या झोतात आला.

ipl 2025 punjab kings prabhsimran singh
Virat Kohli RCB Podcast: ‘आनंदी राहण्यासाठी टीम इंडियाचे कर्णधारपद सोडले’, कोहलीने सोडले मौन; पॉडकास्टमध्ये केले गुपित उघड

प्रभसिमरन सिंग 2023 च्या आयपीएल हंगामात दिल्ली कॅपिटल्स (डीसी) विरुद्ध 65 चेंडूत 103 धावा काढून प्रसिद्धीच्या झोतात आला. त्यावेळी त्याच्या शतकामुळे दिल्ली कॅपिटल्स संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला. पण आयपीएल 2023 मध्ये, प्रभसिमरनला त्या शतकाव्यतिरिक्त फक्त एक अर्धशतक झळकावता आले. त्यामुळे कामगिरीत सातत्य नसल्याने त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्या हंगामात, प्रभसिमरनने 14 सामन्यांमध्ये 25.57 च्या सरासरीने आणि 150.42 च्या स्ट्राईक रेटने 358 धावा केल्या.

ipl 2025 punjab kings prabhsimran singh
Gavaskar criticized BCCI : धोनीसाठी 'IPL'मधील नियम बदलला? गावस्‍कर म्‍हणाले, "भारतीय क्रिकेट.."

आयपीएल 2024 मध्ये, प्रभसिमरन सिंगने पंजाब किंग्जला चांगली सुरुवात दिली, परंतु केवळ दोन डावांमध्ये या फलंदाजाने 50+ धावांचा टप्पा गाठला. याचा अर्थ पुन्हा एकदा त्याच्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसून आला. आयपीएलच्या गेल्या हंगामात प्रभसिमरनने 14 सामने खेळले आणि 334 धावा केल्या. या काळात त्याची सरासरी 23.85 आणि स्ट्राईक रेट 156.80 राहिली.

प्रभसिमरन सिंग स्थानिक क्रिकेटमध्ये पंजाबचे प्रतिनिधित्व करतो. त्याने आतापर्यंत 24 प्रथम श्रेणी, 43 लिस्ट-ए आणि 99 टी-20 सामने खेळले आहेत. या काळात त्याने प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 40.94 च्या सरासरीने 1433 धावा केल्या, ज्यामध्ये 5 शतके आणि चार अर्धशतकांचा समावेश होता. प्रभसिमरनने लिस्ट ए क्रिकेटमध्ये 42.72 च्या सरासरीने 1538 धावा केल्या आहेत. प्रभसिमरनने लिस्ट-ए क्रिकेटमध्ये 5 शतके आणि तेवढीच अर्धशतके झळकावली आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये, प्रभसिमरनने 32.29 च्या सरासरीने 2810 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 2 शतके आणि 19 अर्धशतकांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news