

ipl 2025 playoff scenario fight between delhi, mumbai, lucknow for one position
गुजरात टायटन्सने दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवून आयपीएलच्या प्लेऑफमध्ये धडक मारली. दिल्ली कॅपिटल्सच्या या पराभवासह आरसीबी आणि पंजाब किंग्जनेही अंतिम 4 मध्ये आपली जागा निश्चित केली. साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी दिल्लीच्या गोलंदाजी आक्रमणाला धुळीस मिळवून गुजरातला 10 विकेट्सने ऐतिहासिक विजय मिळवून दिला. तीन संघांनी आता प्लेऑफची तिकिटे मिळवली आहेत. आता चौथ्या जागेसाठीची शर्यत रोमांचक बनली आहे. यासाठी तीन संघांमध्ये चुरशीची लढत पहायला मिळणार आहे. याचे समीकरण जाणून घेऊया.
गुजरातविरुद्धच्या पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्सचा संघ मोठ्या संकटात सापडला आहे. 12 सामन्यांनंतर दिल्लीचे एकूण 13 गुण झाले आहेत. या संघाचे अजून दोन सामने शिल्लक आहेत. यात त्यांना मुंबई इंडियन्स विरुद्ध 21 मे रोजी तर पंजाब किंग्ज विरुद्ध मे रोजी खेळायचे आहे. मुंबईविरुद्धच्या सामन्यातील विजय दिल्लीसाठी प्लेऑफच्या उंबरठ्यावर पोहचेल. पण पंजाबला हरवल्यानंतर त्यांच्यासाठी प्लेऑफ दरवाजा उघडला जाईल. त्यामुळे अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली संघाला प्लेऑफ गाठण्यासाठी उर्वरित दोन्ही सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकावे लागणार आहेत.
दरम्यान, पंजाब किंग्जावर मात करणे दिल्ली कॅपिटल्ससाठी सोपे नसेल. जर दिल्लीला मुंबईविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला तर त्यांचे प्लेऑफमध्ये पोहोचण्याचे स्वप्न भंग होईल. तथापि, जर मुंबईविरुद्ध जिंकल्यानंतर दिल्ली पंजाबकडून हरली तर त्यांना मुंबई विरुद्ध-पंजाब सामन्यावर अवलंबून रहावे लागेल. त्यात जर पंजाबचा विजय झाला तर दिल्लीसाठी प्लेऑफचा मार्ग सोपा असेल.
मुंबई इंडियन्सच्या खात्यात 12 सामन्यांमधून 14 गुण जमा झाले आहेत. हार्दिक पंड्याची सेना पुढील दोन सामन्यांमध्ये दिल्ली आणि पंजाबशी भिडणार आहे. दिल्लीविरुद्धच्या विजयामुळे मुंबईचा प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग बऱ्याच प्रमाणात मोकळा होईल. तथापि, दिल्लीविरुद्धचा सामना हरल्यास, मुंबईला प्लेऑफचे तिकीट मिळेल की नाही हे पंजाब विरुद्ध दिल्ली सामना ठरवेल. त्या सामन्यात पंजाबचा विजय व्हावा यासाठी एमआयला पार्थना करावी लागेल.
लखनौ सुपर जायंट्सचे सध्या 11 सामन्यांत एकूण 10 गुण आहेत. लखनौला उर्वरित तीनही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. यासोबतच ते इतर संघांच्या निकालांवरही अवलंबून असेल. दिल्लीने मुंबईविरुद्धचा सामना जिंकला आणि पंजाब किंग्जविरुद्धचा सामना गमावला तर हे समीकरण लखनौसाठी फायद्याचे ठरेल.
तसेच जर मुंबई इंडियन्सने त्यांचे उर्वरित दोन्ही सामने गमावले तर लखनौला काळजीचे कारणच नसेल. या परिस्थितीत, दिल्लीच्या खात्यात 15 गुण आणि मुंबईच्या खात्यात 14 गुण जमा होती. मात्र, यादरम्यान लखनौला त्यांचे उर्वरित तीनही सामने जिंकावे लागतील. त्यांने एकही सामना गमावला तर त्यांना स्पर्धेतून बारळ मिळेल हे निश्चित.