IPL 2025 Orange Cap Race : ऑरेंज कॅपसाठीची शर्यत बनली रंजक! ‘या’ खेळाडूंनी ओलांडला 500 धावांचा आकडा

विराट कोहली आणि साई सुदर्शन सध्या ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. तथापि, इतर फलंदाज मोठी खेळी करून अव्वल स्थानी पोहचतील.
IPL 2025 Orange Cap Race
Published on
Updated on

मुंबई : आयपीएलचे यंदाचे सामने अधिकाधिक रंजक होत आहेत. दरम्यान, आतापर्यंत तीन संघांचा खेळ संपुष्टात आला आहे. चेन्नई आणि राजस्थाननंतर आता हैदराबाद संघही टॉप 4 च्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. दरम्यान, चालू हंगामात ऑरेंज कॅपसाठीची शर्यत खूपच रोमांचक होत असल्याचे दिसत आहे.

सामन्यागणिक ऑरेंज कॅपचा मानकरी फलंदाज बदलत असल्याचे चित्र आहे. असे असले तरी यंदाच्या IPL हंगामात आतापर्यंत फक्त दोनच खेळाडूंनी 500 धावांचा टप्पा ओलांडला आहे. येत्या काळात या ऑरेंज कॅपसाठीची शर्यत आणखी तिव्र होण्याची शक्यता आहे.

IPL 2025 Orange Cap Race
Virat Kohli Avneet Kaur : कोहलीच्या ‘फोटो लाईक’ वादानंतर अवनीत कौरला लागली लॉटरी! इंस्टा पोस्टच्या दरात 30 टक्के वाढ

रन मशिन कोहलीचा धमाका

या वर्षी आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज विराट कोहली आहे. त्याने 11 सामन्यांमध्ये 505 धावा केल्या आहेत. किंग कोहलीने 7 अर्धशतके ठोकली असून 63.12 च्या सरासरीने आणि 143.46 च्या स्ट्राईक रेटने धावा कुटल्या आहेत.

IPL 2025 Orange Cap Race
IPL Playoffs Qualification : 'प्लेऑफ'साठी रस्‍सीखेच! काेणत्‍या संघाचे पारडे जड?

सूर्या-जैस्वालची बॅट तळपली

कोहली आणि सुदर्शन वगळता, यंदाच्या हंगामात आतापर्यंत कोणत्याही फलंदाजाला 500 धावांचा पल्ला गाठता आलेला नाही, परंतु अनेक फलंदाज त्याच्या जवळ आहेत. सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या खात्यात आतापर्यंत 11 सामन्यांमध्ये 475 धावा जमा झाल्या आहेत. त्याने तीन अर्धशतके फटकावली आहेत. त्याची सरासरी 67.85 तर स्ट्राईक रेट 172.72 राहिला आहे. यशस्वी जैस्वालही मागे नाही. त्याने 12 सामन्यांमध्ये 473 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 43 आहे आणि तो 154.57 च्या स्ट्राईक रेटने धावा करत आहे.

IPL 2025 Orange Cap Race
Gavaskar criticized BCCI : धोनीसाठी 'IPL'मधील नियम बदलला? गावस्‍कर म्‍हणाले, "भारतीय क्रिकेट.."

चेन्नई, राजस्थान आणि हैदराबाद हे संघ आता टॉप 4 च्या शर्यतीतून बाहेर पडले असले तरी, हे संघ त्यांचे उर्वरित सामने खेळतील. याचा अर्थ असा की या संघांच्या फलंदाजांना ऑरेंज कॅप जिंकण्यासाठी अधिक धावा करण्याची संधी मिळेल. तथापि, हे संघ आता फक्त 14 सामने खेळणार असल्याने आणि प्लेऑफमध्ये जाऊ शकणार नाहीत. अशा परिस्थितीत, आयपीएलमध्ये कोणता खेळाडू सर्वाधिक धावा करून ऑरेंज कॅप जिंकतो हे पाहणे मनोरंजक असेल.

IPL 2025 Orange Cap Race
IPLमध्ये फक्त 1 रनने सामना गमावणारे संघ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news