IPL 2025 csk vs rcb : केवळ ५१ धावांची गरज..! विराट माेठा विक्रम माेडण्‍याच्‍या समीप

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्‍या सामन्‍याकडे चाहत्‍यांचे वेधले लक्ष
IPL 2025 csk vs rcb
विराट काेहलीPudhari Photo
Published on
Updated on

IPL 2025 csk vs rcb

टीम इंडियाचा स्‍टार फलंदाज विराट कोहली आणि क्रिकेटमध्‍ये नवा विक्रम हे आता समीकरण झालं आहे. विराटच्‍या नावावर इंडियन प्रीमियर लीग (IPL)मध्‍येही अनेक विक्रमांची नोंद आहे. आयपीएलमध्‍ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज म्‍हणून ओळखला जाणारा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ते सर्वाधिकवेळा अर्धशतकी खेळी करणारा फलंदाज म्‍हणून विक्रम नोंदवला गेला आहे. आता तो आणखी एक मोठा विक्रम मोडण्‍याच्‍या समीप आहे. आज (३ मे) चेन्‍नई चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध होणाऱ्या सामन्यात तो नवा इतिहास रचू शकतो. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या आजच्या सामन्यात कोहली डेव्हिड वॉर्नरच्या मोठ्या विक्रमाकडे लक्ष वेधलेले असेल.

विराटच्‍या नावावर होणार नव्‍या विक्रमाची नोंद

आरसीबी १० सामन्यांमध्ये १४ गुणांसह पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे, नेट रन-रेटमध्ये मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सच्या मागे आहे. कोहली आतापर्यंत महत्त्वपूर्ण कामगिरी करत आहे आणि तो या हंगामात ४४७ धावांसह आघाडीवर धावा करणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. विराट कोहली आयपीएलमध्ये एखाद्या संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम करू शकतो. सध्या हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज डेव्हिड वॉर्नरच्या नावावर आहे. वॉर्नरने आयपीएलमध्ये पंजाब किंग्जविरुद्ध २६ सामन्यात ११३४ धावा केल्या आहेत. हा एखाद्या संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे. आता कोहली वॉर्नरचा हा विक्रम मोडू शकतो. कोहलीला वॉर्नरला मागे टाकण्यासाठी फक्त ५१ धावांची आवश्यकता आहे.

IPL 2025 csk vs rcb
Virat Kohli World Record : कोहलीचा चिन्नास्वामी स्टेडियमवर 3500 धावांचा ‘विराट’ पाऊस! बनला जगातील एकमेव फलंदाज

चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध विराटची फलंदाजी बहरली

चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध कोहलीने ३४ आयपीएल सामन्यांमध्ये ३७.३७ च्या सरासरीने आणि १२५.४६ च्या स्ट्राईक रेटने १०८४ धावा केल्या आहेत. यामध्ये ९ अर्धशतकांचा समावेश आहे. चेन्नईविरुद्ध नाबाद ९० ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. आज विराट कोहलीने उत्‍कृष्‍ट फलंदाजीचे प्रदर्शन केले तर डेव्हिड वॉर्नरचा विक्रम मोडला जाणे जवळजवळ निश्चित आहे.

IPL 2025 csk vs rcb
रोहित, विराट A+ ग्रेडमध्ये, श्रेयस, इशान किशनचे कमबॅक : BCCI कडून वार्षिक कराराची घोषणा!

आयपीएलमध्ये एका संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

1134 - डेव्हिड वॉर्नर विरुद्ध पीबीकेएस (26 डाव)

११३० - विराट कोहली विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (३० डाव)

११०४ - विराट कोहली विरुद्ध पीबीकेएस (३४ डाव)

१०९३ - डेव्हिड वॉर्नर विरुद्ध केकेआर (२८ डाव)

१०८४ - विराट कोहली, विरुद्ध सीएसके (३३ डाव)

१०८३ - रोहित शर्मा, विरुद्ध केकेआर (३५ डाव)

१०५७ - शिखर धवन, विरुद्ध सीएसके (२९ डाव)

IPL 2025 csk vs rcb
विराट कोहलीने वानखेडेवर रचला इतिहास! टी-20मध्ये 13000 धावांचा टप्पा पार

विराटकडे नव्‍या विक्रमाची संधी

आयपीएलमध्ये एकाच संघाविरुद्ध दोनदा ११०० पेक्षा जास्त धावा करण्याचा पराक्रम करणारा विराट कोहली हा एकमेव फलंदाज आहे. त्याने दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज विरुद्ध हा पराक्रम केला आहे. आता कोहली चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध ११०० धावांचा टप्पा गाठणार आहे. हा टप्पा गाठण्यासाठी त्यांना फक्त १६ धावांची आवश्यकता आहे.

आजच्‍या सामन्‍यावर पावसाचे ढग

आज चेन्‍नई विरुद्धचा सामना जिंकत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी)ने प्लेऑफ पात्रतेचा निश्‍चिय केला आहे. चेन्‍नई यापूर्वीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहे. आज चेन्‍नईचा पराभव झाला तरी ही संघासाठी मोठी नामुष्‍की असेल कारण या संघाने आजवर एका हंगामात कधीही त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांकडून दोन्ही लीग सामने गमावले नाहीत. आजच्‍या सामन्‍यावर पावसाचे ढग आहेत. गेल्या दोन दिवसांपासून, बंगळुरूमध्ये सतत पाऊस पडत आहे. आजही येथे पावसाचा अंदाज व्‍यक्‍त करण्‍यात आला आहे. बंगळुरुमध्‍येदुपार किंवा संध्याकाळी पाऊस किंवा विजेच्‍या गडगडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news