

ipl 2025 csk vs pbks leg spinner yuzvendra chahal picks hat trick
चेन्नई : चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पंजाब किंग्जचा स्टार फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने हॅटट्रिक घेतली. बुधवारी झालेल्या सामन्यात त्याने आपल्या तिसऱ्या षटकात चेन्नई सुपर किंग्जच्या चार खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यादरम्यान, चहलने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील दुसरी हॅटट्रिक नोंदवली. 2023 नंतर आयपीएलमधील ही पहिलीच हॅटट्रिक आहे. त्याने दीपक हुडा, अंशुल कंबोज आणि नूर अहमद यांना बाद करून हॅटट्रिक पूर्ण केली.
चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात चहलने तीन षटकांत 32 धावा देत चार विकेट्स घेतल्या. त्याने डावाच्या 19 व्या षटकात एमएस धोनीलाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर त्याने सलग तीन चेंडूंवर तीन खेळाडूंना बाद करून आयपीएलमधील त्याची दुसरी हॅटट्रिक पूर्ण केली.
चेन्नई सुपर किंग्जच्या 19 व्या षटकात चहलने दुसऱ्या चेंडूवर धोनीला बाद केले. त्यानंतर चौथ्या चेंडूवर दीपक हुड्डाची विकेट घेतली. पाचव्या चेंडूवर अंशुल कंबोज क्लीन बोल्ड झाला आणि त्यानंतर नूर अहमद शेवटच्या चेंडूवर मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला.
चहलने यापूर्वी आयपीएल 2022 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध त्याची पहिली आयपीएल हॅटट्रिक घेतली. आयपीएलमध्ये दोन हॅटट्रिक घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चहलने आपले नाव नोंदवले आहे. यापूर्वी युवराज सिंगनेही दोनदा असा पराक्रम केला आहे. अमित मिश्राच्या नावावर आयपीएलमध्ये तीन हॅट्ट्रिकची नोंद आहे.
चहल हा पंजाब किंग्जकडून हॅटट्रिक घेणारा चौथा गोलंदाज ठरला आहे. याआधी युवराज सिंगने पंजाबकडून दोनदा अशी कामगिरी केली होती. अक्षर पटेल आणि सॅम करन यांनी प्रत्येकी एकदा ही कामगिरी केली आहे.
अमित मिश्रा : 3 वेळा (2008, 2011 आणि 2013)
युवराज सिंग : 2 वेळा (2009)
युजवेंद्र चहल : 2 वेळा (2022, 2025)
युवराज सिंग : 2
अक्षर पटेल : 1
सॅम करन : 1
युजवेंद्र चहल : 1