Vinesh Phogat Paris Olympics | विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिकच्या फायनलसाठी अपात्र

विनेश फोगाटला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मोठा धक्का
Vinesh Phogat Paris Olympics
भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट हिला पॅरिस ऑलिम्पिकच्या महिलांच्या ५० किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे.(Image X)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट (Indian Wrestler Vinesh Phogat) हिला पॅरिस ऑलिम्पिकच्या (Paris Olympics) महिलांच्या ५० किलो वजनी कुस्तीच्या अंतिम सामन्यासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. भारतीय संघाने महिला कुस्तीच्या ५० किलो गटातून विनेश फोगाटला अपात्र ठरविल्याची माहिती दिली आहे. २९ वर्षीय फोगाट हिला अंतिम सामन्यासाठी अपात्र ठरवण्यात आले. कारण अंतिम सामन्याच्या दिवशी तिचे वजन १५० ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले. भारतीय संघाने सर्वोत्तम प्रयत्न करूनही आज सकाळी फोगाट यांचे वजन ५० किलोपेक्षा काही ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले. (Vinesh Phogat Disqualified)

Vinesh Phogat Paris Olympics
Vinesh Phogat : पॅरिसमध्ये घुमला विनेशचा शड्डू, भारताची फायनलमध्ये धडक

मंगळवारी रात्री विनेश फोगट यांच्या टीमने सर्वोत्तम प्रयत्न करूनही बुधवारी तिचे वजन कमी झाले नाही. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटने अंतिम फेरीत प्रवेश करून इतिहास रचला. महिलांच्या ५० किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत फोगाटने क्युबाच्या गुझमन लोपेझचा ५-० ने पराभव केला. यासह तिने आपले भारतासाठी ऑलिम्पिक पदक निश्चित केले होते. साक्षी मलिकनंतर ऑलिम्पिक पदक जिंकणारी ती दुसरी भारतीय महिला कुस्तीपटू ठरणार होती. (paris olympics 2024 indian wrestler vinesh phogat) पण आता ओव्हरवेटमुळे तिला अंतिम सामन्यात खेळात येणार नाही.

Paris Olympics : भारतीय संघाकडून खेद व्यक्त

"भारतीय संघाने खेद व्यक्त करत महिला कुस्तीच्या ५० किलो गटातून विनेश फोगाटच्या अपात्रतेची बातमी शेअर केली आहे. संघाने रात्रभर सर्वोतोपरी प्रयत्न करूनही आज सकाळी तिचे वजन ५० किलोपेक्षा काही ग्रॅम जास्त राहिले. यावर कोणतीही टिप्पणी केली जाणार नाही. अशा परिस्थितीत भारतीय ऑलिम्पिक संघटना तुम्हाला विनेशच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती करते,” असे भारतीय ऑलिम्पिक संघटनेने एका निवेदनात म्हटले आहे.

उपांत्यपूर्व फेरीत ओक्सानाचा ७-५ ने पराभव

याआधी उपांत्यपूर्व फेरीत फोगाटचा सामना युक्रेनच्या ओक्साना लिवाचशी झाला होता. भारतीय कुस्तीपटूने पहिल्या फेरीत २ गुण मिळवत चांगली सुरुवात केली. दुसरीकडे, ओक्सानाने जोरदार प्रयत्न केले पण अनुभवी फोगटविरुद्ध गुण मिळवता आले नाहीत. दुसऱ्या फेरीत, खडतर स्पर्धेदरम्यान, दोन्ही खेळाडूंनी ५-५ गुण मिळवले आणि अखेरीस फोगाटने सामना ७-५ असा जिंकला.

Vinesh Phogat Paris Olympics
Neeraj Chopra Paris Olympics : 'गोल्‍डन बॉय' नीरज चोप्रा नवा इतिहास घडविण्‍यास सज्‍ज

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news