

पुढारी ऑनलाईन डेस्क : India vs Zimbabwe T20 Series : शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली युवा भारतीय संघ झिम्बाब्वे दौ-यासाठी रवाना झाला आहे. येथे टीम इंडिया यजमान संघाविरुद्ध पाच टी-20 सामने खेळणार आहे. मालिकेची सुरुवात 6 जुलैपासून होणार आहे. सर्व सामने हरारे स्पोर्ट्स ग्राऊंडवरच भारतीय वेळेनुसार दुपारी 4.30 वाजता सुरू होतील. झिम्बाब्वे संघाची धुरा सिकंदर रझा याच्या खांद्यावर आहे.
पहिला टी-20 सामना : 6 जुलै
दुसरा टी-20 सामना : 7 जुलै
तिसरा टी-20 सामना : 10 जुलै
चौथा टी-20 सामना : 13 जुलै
पाचवा टी-20 सामना : 14 जुलै
शुभमन गिल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंह, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे, साई सुदर्शन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हर्षित राणा.
सिकंदर रझा (कर्णधार), फराज अक्रम, ब्रायन बेनेट, जोनाथन कॅम्पबेल, तेंडाई चतारा, ल्यूक जोंगवे, इनोसंट कैया, क्लाइव्ह मदांडे, वेस्ली माधेवेरे, तदिवनाशे मारुमनी, वेलिंग्टन मसाकादझा, ब्रँडन मावुता, ब्लेसिंग मुझाराब, ब्लेसिंग मुजराब, ब्रँडन मारुमानी. अंतम नक्वी, रिचर्ड नगारवा, मिल्टन शुम्बा
भारत विरुद्ध झिम्बाब्वे टी-20 मालिकेतील सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 4.30 वाजता सुरू होतील. भारतीय चाहते सोनी स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेलवर या मालिकेचा आनंद घेऊ शकतात. सामने सोनी टेन 3 (हिंदी) आणि सोनी टेन 4 (तमिळ/तेलुगु) वर टीव्हीवर थेट प्रक्षेपित केले जातील. मालिकेचे लाईव्ह स्ट्रीमिंग सोनीलिव्ह ॲप आणि वेबसाइटवर देखील इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये उपलब्ध असेल.
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात 8 टी-20 सामने झाले आहेत. यातील 6 सामने भारताने तर 2 सामने झिम्बाब्वेने जिंकले आहेत. दोन्ही संघादरम्यान एकूण 66 एकदिवसीय सामने झाले आहेत. ज्यामध्ये भारताने 54, झिम्बाब्वेने 10 विजय मिळवले आहेत. 2 सामन्यांचा निकाल लागलेला नाही. कसोटीतहे भारतीय संघाचेच वर्चस्व आहे. भारताने 11 आणि झिम्बाब्वेने 2 कसोटी सामने जिंकले आहेत. 2 सामने अनिर्णित राहिले आहेत.
IPL 2024 मध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या अनेक युवा खेळाडूंचा झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यात रायन पराग, अभिषेक शर्मा, तुषार देशपांडे, खलील अहमद, ध्रुव जुरेल, आवेश खान आणि रवी बिश्नोई यांचा समावेश आहे. बीसीसीआयने झिम्बाब्वेला सर्व युवा खेळाडूंना पाठवण्याचा निर्णय घेतलाय. अनुभवी खेळाडूंना आराम देण्यात आलाय.
आयपीएल 2024 मध्ये सनरायजर्स हैदाराबादसाठी शानदार कामगिरी करणाऱ्या नितीश कुमार रेड्डी यालाही संघात स्थान देण्यात आले होते. पण दुखापतीमुळे त्याला मालिकेतून वगळण्यात आले. रेड्डीच्या जागी शिवम दुबे याला संघात स्थान देण्यात आलेय. रेड्डीची दुखापत कोणती आहे, याबाबत बीसीसीआयकडून माहिती देण्यात आलेली नाही. रेड्डी याला पहिल्यांदाच टीम इंडियाकडून बोलवणं आलं होतं, पण दुखापतीमुळे त्याच पादर्पण आता लांबणीवर पडलेय.