India vs Sri Lanka Test Squad 2026 : श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा: सारांश जैनला पदार्पणाची संधी

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू फलंदाज रवींद्र जडेजाचे पुनरागमन
India vs Sri Lanka Test Squad 2026
India vs Sri Lanka Test Squad 2026Pudhari
Published on
Updated on

India vs Sri Lanka Test Squad 2026 : श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आज (दि. २८ जुलै) सकाळी मालिकेसाठी संघ जाहीर केला. आगामी कसोटी मालिकेत मध्य प्रदेशचा अष्टपैलू खेळाडू आणि ऑफ-स्पिनर सारांश जैन याला पहिल्यांदाच राष्ट्रीय संघातून बोलावणे आले असून त्याला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली आहे. याशिवाय, जूनमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकमेव कसोटी सामन्यातून विश्रांती घेतलेल्या/वगळण्यात आलेल्या स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू फलंदाज रवींद्र जडेजा यांचे संघात पुनरागमन झाले आहे.

सारांश जैनला पदार्पणाची संधी

३३ वर्षीय अष्टपैलू खेळाडू सारांश जैन गेल्या काही काळापासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने दमदार कामगिरी करत आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत १८८ बळी टिपले आहेत. केवळ गोलंदाजीतच नव्हे, तर फलंदाजीतही छाप पाडताना २,२२३ धावा केल्या आहेत. यामध्ये २ शतके आणि १४ अर्धशतकांचा समावेश आहे. मध्य प्रदेशच्या या खेळाडूला अखेर त्याच्या सातत्याचे फळ मिळाले असून कसोटी संघात थेट एन्ट्री मिळाली आहे.

बुमराह, साई सुदर्शनला 'फिटनेस क्लिअरन्स'नंतरच संघात समावेश

जसप्रीत बुमराह आणि साई सुदर्शन यांच्या फिटनेसबाबत अजूनही काही प्रश्न उपस्थित आहेत. 'BCCI सेंटर ऑफ एक्सलन्स' (COE) कडून फिटनेस क्लिअरन्स मिळाल्यानंतरच या दोघांचा अंतिम ११ मध्ये समावेश केला जाईल. अष्‍टपैलू वॉशिंग्टन सुंदर पहिल्या कसोटी सामन्यासाठी उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले आहे. इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यान त्याला दुखापत (हॅमस्ट्रिंग) झाली होती; त्यामुळे त्याला पहिल्या कसोटी संघात स्थान मिळालेले नाही. बुमराहदेखील इंग्लंड दौऱ्यातच दुखापतग्रस्त झाला होता.

India vs Sri Lanka Test Squad 2026
Test Cricket Rules Update | बॅड लाईटमुळे व्यत्यय आल्यास कसोटीत गुलाबी चेंडू वापरता येणार

कसोटी मालिकेआधी भारतीय संघ खेळणार सराव सामना

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) अंतर्गत होणाऱ्या या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघ सराव सामना खेळणार आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, ७ ऑगस्टपासून कोलंबो येथे भारतीय संघ ४ दिवसांचा सराव सामना खेळेल.यानंतर १५ ऑगस्टपासून अधिकृत कसोटी मालिकेला सुरुवात होईल:

पहिला कसोटी सामना: १५ ऑगस्ट (गाले)

दुसरा कसोटी सामना: २३ ऑगस्ट (कोलंबो)

India vs Sri Lanka Test Squad 2026
Test Cricket Rules : ICC कडून नव्या नियमांची घोषणा! वेळकाढूपणा, शॉर्ट रन, चेंडूशी छेडछाड... प्रत्येक गुन्ह्याला मिळणार शिक्षा

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ

शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत (विकेटकीपर), साई सुदर्शन*, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुतार, जसप्रीत बुमराह*, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल आणि सारांश जैन.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news