IND vs SA 1st Test Live: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला कसोटी सामना आजपासून; केव्हा आणि कुठे पाहाल LIVE?

IND vs SA 1st Test Live Streaming: भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील कसोटी मालिकेतील पहिला सामना आज ईडन गार्डन्समध्ये सुरू होत आहे. पाच वर्षांनंतर भारतीय भूमीवर दोन्ही संघ टेस्टमध्ये भिडत आहेत.
IND vs SA 1st Test Live Streaming
IND vs SA 1st Test Live StreamingPudhari
Published on
Updated on

IND vs SA 1st Test Live Streaming Updates: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना आज, 14 नोव्हेंबरपासून कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर सुरू होत आहे. जवळपास पाच वर्षांनंतर भारतात दोन्ही संघ टेस्ट सामन्यात आमने-सामने येत असल्याने क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

इंग्लंडविरुद्धची मालिका 2-2 ने ड्रॉ करताच भारताचा आत्मविश्वास उंचावला होता. त्यानंतर वेस्ट इंडिजला केलेल्या क्लीन स्वीपने टीम इंडिया आणखी सज्ज झाली. नवा कर्णधार शुभमन गिल याच्या नेतृत्वाखाली भारताची नजर थेट WTC 2027 फायनलवर आहे. दुसरीकडे, विद्यमान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन दक्षिण आफ्रिका संघ पाकिस्तानवर केलेल्या विजयानंतर दमदार फॉर्ममध्ये आहे. टेन्बा बावुमाही WTC 2025 फायनलनंतर पहिल्यांदाच कसोटी नेतृत्व करत आहेत.

सामना केव्हा सुरू होणार?

पहिला कसोटी सामना 14 नोव्हेंबर, सकाळी 9.30 वाजता (IST) सुरू होईल.

सामना कुठे खेळला जाणार?

हा सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्समध्ये होणार आहे.

LIVE सामना कुठे पाहाल?

  • टेलिव्हिजन: Star Sports 1, Star Sports 1 Hindi तसेच इतर प्रादेशिक चॅनेल्स

  • ऑनलाइन स्ट्रीमिंग: JioCinema आणि Hotstar अॅप व वेबसाइटवर उपलब्ध

IND vs SA 1st Test Live Streaming
Team India Upcoming Matches : 4 कसोटी, 6 वनडे, 10 टी-20... जाणून घ्या टीम इंडियाचे पुढील वेळापत्रक

भारताचा संघ

शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार/विकेटकीपर), ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, यशस्वी जायसवाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, वॉशिंगटन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, आकाश दीप, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल.

दक्षिण आफ्रिकेचा संघ

टेन्बा बावुमा (कर्णधार), ज़ुबैर हमजा, साइमन हार्मर, मारको जान्सन, कॉर्बिन बॉश, डेवाल्ड ब्रेविस, टोनी डेझोरजी, सेनुरन मुथुसामी, वियान मुल्डर, रयान रिकेलटन (विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, काइल वेरेन (विकेटकीपर), केशव महाराज, एइडन मार्करम.

IND vs SA 1st Test Live Streaming
India disaster ranking: आपत्तीग्रस्त देशांच्या यादीत भारत नवव्या स्थानी; ३० वर्षांत ८०,००० बळी! पाहा धक्कादायक अहवाल

हवामान अनुकूल असल्यास आजपासून क्रिकेटप्रेमींसाठी रोमांचक कसोटी मालिकेची सुरुवात होणार आहे. भारताला घरच्या मैदानावर पराभूत करणे कठीण असते, पण दक्षिण आफ्रिकेचा संघही कमी नाही. त्यामुळे सामना पहिल्याच दिवसापासून चुरशीचा होण्याची दाट शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news