Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीची भारतीय संघात दमदार एंट्री; श्रेयसकडे कर्णधारपद; T20I मालिकांसाठी भारतीय संघ जाहीर

India T20 Squad Announcement: आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिका तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघांची घोषणा आज (दि. ६) करण्यात आली.
India T20 Squad Announcement
India T20 Squad Announcementfile photo
Published on
Updated on

नवी दिल्ली: आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिका तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघांची घोषणा आज (दि. ६) करण्यात आली. श्रेयस अय्यरकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले असून तिलक वर्माची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीचा तिन्ही संघांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. मात्र, तो आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होईल; त्याने मोहम्मद सिराजची जागा घेतली आहे. सिराजचा इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठीच्या टी-२० संघात समावेश करण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) मुख्यालयात पुरुष निवड समितीच्या बैठकीत या बदलाचा निर्णय घेण्यात आला आणि शनिवारी त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.

India T20 Squad Announcement
R Praggnanandhaa: आर. प्रज्ञानंदने इतिहास रचला; नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय ठरला

आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठीचा संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार), टिळक वर्मा (उपकर्णधार), रवी बिश्नोई, अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, मोहम्मद सिराज, संजू सॅमसन, अक्षर पटेल, हर्षित राणा, इशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, शिवम दुबे, वरुण चक्रवर्ती, प्रिन्स यादव आणि वैभव सूर्यवंशी.

इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठीचा संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार), टिळक वर्मा (उपकर्णधार), रवी बिश्नोई, अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, मोहम्मद सिराज, संजू सॅमसन, अक्षर पटेल, हर्षित राणा, इशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, शिवम दुबे, वरुण चक्रवर्ती, प्रिन्स यादव आणि वैभव सूर्यवंशी.

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), रवी बिश्नोई, अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन, अक्षर पटेल, हर्षित राणा, ईशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, शिवम दुबे, वरुण चक्रवर्ती, प्रिन्स यादव आणि वैभव सूर्यवंशी.

भारताचा आयर्लंड दौरा (जून)

२६ जून : पहिला टी-२०, बेलफास्ट

२८ जून : दुसरा टी-२०, बेलफास्ट

भारताचा इंग्लंड दौरा (जुलै)

१ जुलै : पहिला टी-२०, चेस्टर-ले-स्ट्रीट

४ जुलै : दुसरा टी-२०, मँचेस्टर

७ जुलै : तिसरा टी-२०, नॉटिंगहॅम

९ जुलै : चौथा टी-२०, ब्रिस्टल

११ जुलै : पाचवा टी-२०, साउथॅम्प्टन

एकदिवसीय मालिका

१४ जुलै : पहिला वनडे, बर्मिंगहॅम

१६ जुलै : दुसरा वनडे, कार्डिफ

१९ जुलै : तिसरा वनडे, लॉर्ड्स

India T20 Squad Announcement
IND vs AFG 1st Test Live: केएल राहुल शतकाच्या उंबरठ्यावर, गिलचीही दमदार फलंदाजी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news