

कतारची राजधानी दोहा येथे १४ नोव्हेंबरपासून आशिया कप रायझिंग स्टार्स २०२५ स्पर्धेला सुरुवात होईल. या स्पर्धेत आशियातील एकूण ८ देशांचे संघ सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे, या सर्व सघांचे 'अ' किंवा ज्युनिअर संघ स्पर्धेत उतरणार आहेत, ज्यासाठी नुकतीच भारत 'अ' संघाची घोषणा करण्यात आली आहे. स्पर्धेत उपांत्य आणि अंतिम सामन्यांसह एकूण १५ सामने खेळले जातील. क्रिकेटप्रेमींना या स्पर्धेतही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज लढत पाहायला मिळणार आहे.
जितेश शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ या स्पर्धेत खेळणार आहे. तसेच, वैभव सूर्यवंशी, प्रियांश आर्या, अभिषेक पोरेल, नेहाल वढेरा यांसारखे अनेक युवा खेळाडू यात आपली चमक दाखवतील. महत्त्वाचे म्हणजे, या स्पर्धेतही पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांना एकाच गटात स्थान मिळाले आहे.
आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेसाठी आठ संघांना प्रत्येकी चार-चारच्या दोन गटांमध्ये विभागण्यात आले आहे.
गट 'अ' : अफगाणिस्तान 'अ', बांगलादेश 'अ', हाँगकाँग आणि श्रीलंका 'अ'.
गट 'ब' : इंडिया 'अ', ओमान, पाकिस्तान शाहीन्स आणि यूएई.
या स्पर्धेत दोन्ही गटांमधील संघ आपापसात प्रत्येकी एकदा भिडतील. त्यानंतर दोन्ही गटांमधील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. उपांत्य फेरीतील विजेत्या संघांमध्ये अंतिम मुकाबला रंगेल.
आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धा टी-२० या स्वरूपात खेळली जाईल. दररोज दोन सामने आयोजित केले जातील, तर अंतिम सामना २३ नोव्हेंबरला होणार आहे.
भारत 'अ' आणि पाकिस्तान शाहीन्स यांच्यात स्पर्धेतील सर्वात मोठी आणि बहुप्रतिक्षित लढत असेल. यापूर्वी झालेल्या इमर्जिंग आशिया कपमध्ये रियान परागच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात मोठी चुरस दिसली होती.
यावेळेस, दोन्ही संघ १६ नोव्हेंबर रोजी एकमेकांना भिडतील. हा हाय-व्होल्टेज सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजल्यापासून सुरू होईल.
ओमान विरुद्ध पाकिस्तान शाहीन्स : १४ नोव्हेंबर (दुपारी १२ वा.)
भारत 'अ' विरुद्ध यूएई : १४ नोव्हेंबर (सायंकाळी ५ वाजता)
बांगलादेश 'अ' विरुद्ध हाँगकाँग : १५ नोव्हेंबर : (दुपारी १२ वा.)
अफगाणिस्तान 'अ' वि. श्रीलंका 'अ' : १५ नोव्हेंबर (सायंकाळी ५ वाजता)
ओमान विरुद्ध यूएई : १६ नोव्हेंबर (दुपारी ३ वा.)
भारत 'अ' विरुद्ध पाकिस्तान शाहीन्स : १६ नोव्हेंबर (रात्री ८ वा.)
हाँगकाँग विरुद्ध श्रीलंका 'अ' : १७ नोव्हेंबर (दुपारी ३ वा.)
अफगाणिस्तान 'अ' विरुद्ध बांगलादेश 'अ' : १७ नोव्हेंबर (रात्री ८ वा.)
पाकिस्तान शाहीन्स विरुद्ध यूएई : १८ नोव्हेंबर (दुपारी ३ वा.)
इंडिया 'अ' विरुद्ध ओमान : १८ नोव्हेंबर (रात्री ८ वा.)
अफगाणिस्तान 'अ' विरुद्ध हाँगकाँग : १९ नोव्हेंबर (दुपारी ३ वा.)
बांगलादेश 'अ' विरुद्ध श्रीलंका 'अ' : १९ नोव्हेंबर (रात्री ८ वा.)
उपांत्य सामना १ : २१ नोव्हेंबर (दुपारी ३ वा.)
उपांत्य सामना २ : २१ नोव्हेंबर (रात्री ८ वा.)
अंतिम सामना : २३ नोव्हेंबर (रात्री ८ वा.)
कर्णधार : जितेश शर्मा (यष्टीरक्षक)
फलंदाज : प्रियांश आर्य, वैभव सूर्यवंशी, नेहल वढेरा, सूर्यांश शेडगे, नमन धीर (उपकर्णधार).
अष्टपैलू : रमणदीप सिंह, हर्ष दुबे, आशुतोष शर्मा.
गोलंदाज : यश ठाकूर, गुरजापनीत सिंह, विजय कुमार वैश्य, युद्धवीर सिंह चरक, सुयश शर्मा.
यष्टीरक्षक : अभिषेक पोरेल.
राखीव खेळाडू : गुरनूर सिंह बरार, कुमार कुशाग्र, तनुश कोटियन, समीर रिझवी, शेख रशीद.