IND vs WI 1st ODI : विराट नाबाद १३९, गिल ११०! द्विशतकी तडाख्याने २९६ चे आव्हान ४२ षटकांतच फस्त

अवघ्या ८८ चेंडूंत १० चौकार आणि ९ षटकारांसह कोहलीचा तडाखा
ind vs wi 1st odi cricket score match report thiruvananthapuram Virat Kohli Shubman Gill
Published on: 
Updated on: 

तिरुवनंतपुरम : दिग्‍गज सुपरस्‍टार विराट कोहली (नाबाद १३९)-शुभमन गिल (११०) यांची तडफदार शतके आणि कुलदीप यादवच्‍या ४ बळींच्‍या जोरावर भारताने येथील पहिल्‍या वन डे लढतीत विंडीजला ८ गडी राखून धुळ चारत ३ सामन्‍यांच्‍या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. प्रारंभी, ग्रीव्‍हजच्‍या शतकी तडाख्‍यामुळे विंडीजने ७ बाद २९५ अशी आव्‍हानात्‍मक धावसंख्‍या उभारली होती. मात्र, प्रत्‍युत्तरात विराट कोहली व गिल यांनी आणखी आक्रमक फटकेबाजी करत हे आव्‍हान तोकडे ठरवले. भारताने यामुळे केवळ ४१.४ षटकातच विजयाचे लक्ष्‍य गाठले.

विजयासाठी २९६ धावांचे तगडे आव्‍हान असताना रोहित ३२ धावांवर बाद झाला. मात्र, त्‍यानंतर विराटने ८८ चेंडूत १० चौकार, ९ षटकारांसह नाबाद १३९ तर शुभमन गिलने १०८ चेंडूत १३ चौकार, १ षटकारासह ११० धावा झोडपत विजय अगदी आवाक्‍यात आणला. उभयतांनी दुसर्‍या गड्यासाठी १५१ धावांची भागीदारी साकारली. विराटने षटकार साजरे करताना खेचलेला उत्तुंग षटकार तर निव्‍वळ डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला.

ind vs wi 1st odi cricket score match report thiruvananthapuram Virat Kohli Shubman Gill
Virat Kohli 55th Century : ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिन कोहली’चे ५५ वे शतक; सचिन तेंडुलकरचा आणखी एक विक्रम मोडत ऐतिहासिक झेप

या शतकी खेळीसह कोहलीने अनेक जागतिक विक्रम मोडीत काढले. आपल्या ३१५ व्या सामन्यातील ३०३ व्या डावात कोहलीने १५,००० वन डे धावांचा टप्पा पार केला. सचिन तेंडुलकरने ३७७ डावांत ही कामगिरी केली होती; त्यामुळे कोहली आता वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद १५,००० धावा करणारा फलंदाज ठरला आहे. एकंदरीत सर्वाधिक धावांच्या यादीत कोहली (सुमारे ६० ची सरासरी) केवळ सचिन तेंडुलकर (१८,४२६ धावा) यांच्यानंतर दुसऱ्या स्थानावर आहे.

ind vs wi 1st odi cricket score match report thiruvananthapuram Virat Kohli Shubman Gill
Virat Kohli Record : ‘किंग कोहली’चा नवा ‘विराट’ पराक्रम! सर्वात वेगवान १५ हजार धावा, सचिन तेंडुलकरचा महाविक्रम मोडीत

वेस्ट इंडिजविरुद्ध कोहलीचे हे एकदिवसीय कारकिर्दीतील १० वे शतक ठरले. वन डे क्रिकेटमध्ये दोन वेगवेगळ्या प्रतिस्पर्धी संघांविरुद्ध प्रत्येकी १० किंवा त्याहून अधिक शतके झळकावणारा तो जगातील पहिलाच फलंदाज बनला आहे. (ऑस्ट्रेलियाविरुद्धही त्याच्या नावावर ८ शतके आहेत).

ind vs wi 1st odi cricket score match report thiruvananthapuram Virat Kohli Shubman Gill
Asian Games 2026 : सर्वेश कुशारेने रचला इतिहास; आशियाई क्रीडा स्पर्धेत ५६ वर्षांची प्रतीक्षा संपवत उंच उडीत पटकावले रौप्यपदक

संक्षिप्‍त धावफलक

भारत : ४१.४ षटकात २ बाद ३००. (विराट कोहली ८८ चेंडूत नाबाद १३९, शुभमन गिल १०८ चेंडूत ११०)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news