

IND vs SA 2nd ODI Full Match Details: रांचीतील पहिला सामना जिंकून टीम इंडियाने वनडे मालिकेची दमदार सुरुवात केली. 349 धावांचा पर्वताएवढ्या स्कोर केल्यानंतर भारताने दक्षिण आफ्रिकेला 17 धावांनी पराभूत करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. विराट कोहलीच्या जोरदार शतकाने, रोहित शर्माच्या तडाखेबाज 57 धावांनी आणि केएल राहुलच्या संयमी अर्धशतकाने भारतीय फलंदाजीला धार आली आहे.
गोलंदाजीत कुलदीप यादवने निर्णायक विकेट घेत आफ्रिकन खेळाडूंची कंबर मोडली. आता सर्वांचे लक्ष मालिकेतील दुसऱ्या वनडे सामान्यावर आहे, हा सामना भारताच्या मालिका विजयासाठी निर्णायक ठरू शकतो.
भारत आणि दक्षिण आफ्रिका मालिकेतील दुसरा सामना 3 डिसेंबर रोजी रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. दुपारी 1:30 वाजता सामन्याची सुरुवात होईल. भारत हा सामना जिंकून मालिका 2-0 ने खिशात टाकण्याच्या प्रयत्नात असेल, तर आफ्रिका मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल.
शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर आहेत. त्यामुळे कर्णधारपदाची धुरा केएल राहुलकडे सोपवण्यात आली आहे. ऋषभ पंतची पुनरागमनानंतरची उपस्थिती भारतीय संघासाठी मोठा दिलासा ठरत आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांच्या फॉर्ममुळे भारताची टॉप ऑर्डर अतिशय मजबूत दिसत आहे.
टीव्ही प्रसारण: Star Sports Network
LIVE Streaming: JioCinema / Disney+ Hotstar अॅप आणि वेबसाइट
सामना दुपारी 1:30 वाजता सुरू होईल.
केएल राहुल (कॅप्टन), विराट कोहली, रोहित शर्मा, यशस्वी जायसवाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, तिलक वर्मा, वाशिंगटन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंह, ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, हर्षित राणा, ऋतुराज गायकवाड.
टेम्बा बावुमा (कॅप्टन), ओटनील बार्टमॅन, कॉर्बिन बॉश, मॅथ्यू ब्रेट्झके, डेवाल्ड ब्रेविस, नांद्रे बर्गर, क्विंटन डी कॉक, रुबेन हर्मन, केशव महाराज, टोनी डी झोरज़ी, रयान रिकेल्टन, मार्को यान्सन, एडन मार्कराम, लुंगी एनगिडी, प्रेनेलन सब्रायन.