IND vs NZ | वनडेनंतर आता भारत-न्यूझीलंडमध्ये रंगणार टी-20 चा थरार; जाणून घ्या कधी आणि कुठे रंगणार सामने?

IND vs NZ T20I Series Full Schedule | श्रेयस अय्यरचा पहिल्या तीन सामन्यांसाठी संघात समावेश
IND vs NZ | वनडेनंतर आता भारत-न्यूझीलंडमध्ये रंगणार टी-20 चा थरार; जाणून घ्या कधी आणि कुठे रंगणार सामने?
Published on
Updated on
Summary

IND vs NZ T20I Series Full Schedule: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेला २१ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. भारतीय वेळेनुसार हे सामने कधी सुरू होतील, याची सविस्तर माहिती जाणून घेवूया

IND vs NZ T20I Series Full Schedule

नवी दिल्ली: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ सामन्यांची वनडे मालिका नुकतीच पार पडली असून आता सर्वांचे लक्ष टी-२० मालिकेवर केंद्रित झाले आहे. वनडे मालिकेत भारताला न्यूझीलंडकडून १-२ असा पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे आता टी-२० मालिकेत या पराभवाचा बदला घेण्याची सुवर्णसंधी टीम इंडियाकडे आहे. विशेष म्हणजे, वनडे मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व शुभमन गिलने केले होते, मात्र टी-२० मालिकेत सूर्यकुमार यादव कर्णधार म्हणून मैदानात उतरणार आहे.

२१ जानेवारीपासून T 20 क्रिकेटचा थरार

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी मैदानात उतरणारा भारतीय संघ बराच वेगळा असेल. वनडे कर्णधार शुभमन गिल आणि केएल राहुल या मालिकेत खेळताना दिसणार नाहीत. श्रेयस अय्यरचा पहिल्या तीन सामन्यांसाठी संघात समावेश करण्यात आला असून, तिलक वर्मा सध्या अनुपलब्ध असल्याने अय्यरला अंतिम ११ मध्ये स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे, वनडे मालिकेत चमकदार कामगिरी करणारा किवी संघ सध्या फॉर्मात असून टीम इंडियासमोर त्यांचे तगडे आव्हान असणार आहे.

IND vs NZ | वनडेनंतर आता भारत-न्यूझीलंडमध्ये रंगणार टी-20 चा थरार; जाणून घ्या कधी आणि कुठे रंगणार सामने?
IND vs NZ : न्यूझीलंडच्या डॅरिल मिचेलचा ऐतिहासिक पराक्रम! भारतीय भूमीवर सलग ५ वेळा ५०+ धावा करणारा जगातील पहिला फलंदाज

सर्व सामने सायंकाळी ७ वाजता

ही मालिका २१ जानेवारी (बुधवार) पासून सुरू होईल. दुसरा सामना २३ जानेवारीला, तिसरा २५ जानेवारीला, चौथा २८ जानेवारीला आणि मालिकेतील शेवटचा थरार ३१ जानेवारीला पाहायला मिळेल. हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:०० वाजता सुरू होतील.

IND vs NZ | वनडेनंतर आता भारत-न्यूझीलंडमध्ये रंगणार टी-20 चा थरार; जाणून घ्या कधी आणि कुठे रंगणार सामने?
ind vs nz odi : क्रिकेटमध्‍येही 'भाषा'वाद...! भारत-न्यूझीलंड सामन्यावेळी नेमकं काय घडलं?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news