NZ vs IND 3rd ODI: भारताचा मालिका पराभव आता अशक्य.... तिसऱ्या सामन्यात पाऊस आला धावून

NZ vs IND 3rd ODI: सामना सुरू झाला त्यानंतर पावसामुळे काही तासानंतर टॉस झाला मात्र सामना काही सुरू होऊ शकला नाही.
NZ vs IND 3rd ODI
NZ vs IND 3rd ODIpudhari
Published on: 
Updated on: 

NZ vs IND 3rd ODI: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्याच्या मालिकेतील तिसरा सामना आज हॅमिल्टन इथं होणार होता. मात्र पासवामुळे हा सामना रद्दा करावा लागला. सामना सुरू झाला त्यानंतर पावसामुळे काही तासानंतर टॉस झाला मात्र सामना काही सुरू होऊ शकला नाही. पाऊस अधून मधून हजेरी लावत होता. अखेर हा सामना रद्द करावा लागला.

NZ vs IND 3rd ODI
IPL Trade Hardik Arshdeep: हार्दिक पांड्याच्या नादात अर्शदीपला सोडून पंजाब किंग्ज करतंय मोठी चूक; स्टॉयनिसचा पत्ता कट?

मालिका बरोबरीत

भारताने या मालिकेत पहिले दोन सामने जिंकून २ - ० अशी आघाडी घेतली आहे. आता तिसरा सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळं पुढीर दोन सामन्यात जरी न्यूझीलंडचा विजय झाला तरी मालिका २-२ अशी बरोबरीत सुटणार आहे. मात्र ज्या प्रकारे भारत या मालिकेत खेळत आहे ते पाहता भारत मालिका विजयाच्या दृष्टीकोणातूनच आगेकूच करेल असं दिसतंय. आता मालिकेतील चौथा सामना शुक्रवारी १३ नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे.

NZ vs IND 3rd ODI
NZ vs IND Arshdeep Singh: श्रीनाथ अन् शमी नंतर 'अर्शदीप'च... न्यूझीलंडमध्ये केली मोठी कामगिरी, सामन्यावर भारताची पकड

आज नेमकं काय झालं?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या सामन्यात सतत पाऊस येत होता. जवळपास ३ तास उशिराने नाणेफेक झाली. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सामना प्रत्येकी ४० षटकांचा घेण्याचा निर्णय झाला. मात्र नाणेफेक झाल्यावर काही मिनिटातच उसंत घेतलेल्या पावसाने पुन्हा सुरूवात केली. त्यानंतर जवळपास अडीच तास पावसाचे तांडव सुरू होते. त्यामुळे अखेर पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.