Sai Sudharsan Duck : साई सुदर्शनला भोपळा! कसोटी पदार्पणात लाजिरवाणा विक्रम, भारतीय कसोटी इतिहासात ‘असे’ प्रथमच घडले

पदार्पणाच्या कसोटी डावात शून्यावर बाद होणारा सुदर्शन एकूण 29 वा भारतीय खेळाडू आहे.
ind vs eng leeds test sai sudharsan
Published on
Updated on

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना शुक्रवारपासून लीड्स येथील हेडिंग्ले क्रिकेट मैदानावर सुरू झाला. या सामन्यातून भारतीय संघातर्फे साई सुदर्शनला पदार्पणाची संधी मिळाली. चेतेश्वर पुजाराच्या हस्ते सुदर्शनला कसोटी कॅप प्रदान करण्यात आली. भारताकडून कसोटी खेळणारा सुदर्शन 317 वा खेळाडू ठरला आहे.

तथापि, 23 वर्षीय साई सुदर्शनला आपल्या पदार्पणाच्या डावात विशेष प्रभावी कामगिरी करता आली नाही. साईने केवळ 4 चेंडूंचा सामना केला आणि तो शून्यावर तंबूत परतला. डावातील 26 व्या षटकातील चौथ्या चेंडूवर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने यष्टिरक्षक जेमी स्मिथकरवी साई सुदर्शनला झेलबाद केले. सुदर्शनने लेग-स्टंपवरील चेंडूवर फ्लिक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, फटक्याची वेळ अचूक न साधल्याने चेंडू बॅटची कड घेऊन स्मिथच्या उजवीकडे गेला, जिथे त्याने झेल टिपण्यात कोणतीही कसूर केली नाही.

ind vs eng leeds test sai sudharsan
Yashasvi Jaiswal Century : जैस्वालचा इंग्लंडवर हल्लाबोल! लीड्स कसोटीत धडाकेबाज शतक ठोकत उडवली दाणादाण

भारतीय कसोटी इतिहासात असे प्रथमच घडले आहे की, पदार्पणाच्या कसोटी डावात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरलेला एखादा फलंदाज खाते न उघडताच बाद झाला. इतकेच नव्हे तर, कसोटी पदार्पणाच्या डावात पहिल्या तीन क्रमांकावर फलंदाजी करताना शून्यावर बाद होणारा सुदर्शन हा तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.

यापूर्वी कृष्णम्माचारी श्रीकांत आणि देवांग गांधी यांच्या नावावरही अशा लाजिरवाण्या विक्रमाची नोंद आहे. हे दोन्ही खेळाडू त्यांच्या पदार्पणाच्या कसोटी डावात सलामीवीर म्हणून खेळले होते. पदार्पणाच्या कसोटी डावात शून्यावर बाद होणारा सुदर्शन एकूण 29 वा भारतीय खेळाडू आहे.

ind vs eng leeds test sai sudharsan
IND vs ENG Leeds Test : राहुल-यशस्वीची विक्रमी सलामी! पहिल्याच कसोटीत मोडला 39 वर्षे जुना विक्रम, इंग्लंड गोलंदाजांची धुळधाण

पदार्पणाच्या डावात शून्यावर बाद झालेले भारतीय फलंदाज

कृष्णम्माचारी श्रीकांत वि. इंग्लंड, वानखेडे 1981

देवांग गांधी वि. न्यूझीलंड, मोहाली, 1999

साई सुदर्शन वि. इंग्लंड, लीड्स 2025

पदार्पणाच्या कसोटी डावात शून्यावर बाद झालेले भारतीय फलंदाज

1. चंदू सरवटे - 1946

2. जेनी इराणी - 1947

3. एस.ए. बॅनर्जी - 1948

4. गुलाम अहमद - 1948

5. सुभाष गुप्ते - 1951

6. गुलाबराय रामचंद्र - 1952

7. जसुभाई पटेल - 1955

8. मनोहर हार्डीकर - 1958

9. वेंकटप्पा मुद्दैया - 1959

10. मन मोहन सूद - 1960

11. भगवत चंद्रशेखर - 1964

12. उमेश कुलकर्णी - 1967

13. एकनाथ सोलकर - 1969

14. गुंडप्पा विश्वनाथ - 1969

15. धीरज परसाना - 1979

16. कृष्णम्माचारी श्रीकांत - 1981

17. मनिंदर सिंग - 1982

18. रशीद पटेल - 1988

19. विवेक राजदान - 1989

20. अॅबी कुरुविला - 1997

21. विजय भारद्वाज - 1999

22. देवांग गांधी - 1999

23. रॉबिन सिंग - 1999

24. अजय रात्रा - 2002

25. पार्थिव पटेल - 2002

26. ऋद्धिमान साहा - 2010

27. आर. अश्विन - 2011

28. उमेश यादव - 2011

29. साई सुदर्शन - 2025

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news