T20 World Cup : इंग्लंडची कशीबशी 'सुपर-८' मध्ये एन्ट्री, इटलीने फोडला घाम; सॅम कुरनमुळे वाचली ब्रिटिशांची लाज

England vs Italy : आयसीसी क्रमवारीत २६ व्या क्रमांकावर असलेल्या इटलीने ज्या पद्धतीने बलाढ्य इंग्लंडला झुंजवले, ते पाहून संपूर्ण क्रिकेट जगत थक्क झाले.
T20 World Cup : इंग्लंडची कशीबशी 'सुपर-८' मध्ये एन्ट्री, इटलीने फोडला घाम; सॅम कुरनमुळे वाचली ब्रिटिशांची लाज
Published on
Updated on

कोलकाता : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांना एका मोठा थरार अनुभवायला मिळाला. दोन वेळचा विश्वविजेता इंग्लंड संघ दुबळ्या मानल्या जाणाऱ्या इटलीविरुद्ध पराभवाच्या छायेत होता. मात्र, अटीतटीच्या लढतीत सॅम कुरनच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने इटलीचा २४ धावांनी पराभव करत कसाबसा 'सुपर-८' मध्ये प्रवेश केला. आयसीसी क्रमवारीत २६ व्या क्रमांकावर असलेल्या इटलीने ज्या पद्धतीने बलाढ्य इंग्लंडला झुंजवले, ते पाहून संपूर्ण क्रिकेट जगत थक्क झाले आहे.

बटलर अपयशी, विल जॅक्सचे वादळ

टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडची सुरुवात अडखळत झाली. अनुभवी जोस बटलर अवघ्या ३ धावांवर बाद झाला. फिल सॉल्टने (२८ धावा) आक्रमक सुरुवात केली खरी, पण १३ व्या षटकापर्यंत १०५ धावांवर इंग्लंडचे ५ बडे फलंदाज तंबूत परतले होते. कर्णधार हॅरी ब्रूकही स्वस्तात बाद झाला. अशा वेळी विल जॅक्सने डावाची सूत्रे हाती घेतली. जॅक्सने अवघ्या २१ चेंडूत नाबाद ५३ धावांची स्फोटक खेळी करत इंग्लंडला ७ बाद २०२ धावांपर्यंत मजल मारून दिली. इटलीकडून ग्रांट स्टीवर्ट आणि कृष्ण कालुगमागे यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.

T20 World Cup : इंग्लंडची कशीबशी 'सुपर-८' मध्ये एन्ट्री, इटलीने फोडला घाम; सॅम कुरनमुळे वाचली ब्रिटिशांची लाज
Team India Super 8 Schedule : टीम इंडिया ‘सुपर-८’ मध्ये ‘या’ 3 संघांशी भिडणार, कधी-कुठे रंगणार सामने? जाणून घ्या वेळापत्रक

इटलीचा प्रतिहल्ला: मनेन्टी आणि मॉस्काची फटकेबाजी

२०३ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना जोफ्रा आर्चरने इटलीचे २ गडी शून्यावर बाद करून इंग्लंडला दणदणीत सुरुवात करून दिली. १ धावेवर २ बळी गेल्यावर इटली हा सामना लवकर गमावेल असे वाटत होते. पण जॅस्टिन मॉस्का (४३) आणि बेन मनेन्टी यांनी चित्र पालटले. या जोडीने ९२ धावांची धडाकेबाज भागीदारी केली. मनेन्टीने तर केवळ २२ चेंडूत अर्धशतक ठोकून इंग्लिश गोलंदाजांची दाणादाण उडवली. त्याने आपल्या ६० धावांच्या खेळीत ६ उत्तुंग षटकार लगावले.

सॅम कुरन ठरला 'संकटमोचक'

एकवेळ इटली विजयाच्या समीप पोहोचली होती. १८ व्या षटकात ग्रांट स्टीवर्टने आदिल रशीदला ३ षटकार खेचत सामन्यात रंगत आणली. शेवटच्या २ षटकात इटलीला विजयासाठी ३० धावांची गरज होती. अशा तणावाच्या स्थितीत सॅम करन इंग्लंडसाठी धावून आला. त्याने १९ व्या षटकात केवळ ५ धावा देत स्टीवर्टचा (४५ धावा) महत्त्वाचा बळी घेतला आणि इटलीच्या विजयाच्या आशा संपुष्टात आणल्या. इटलीचा संपूर्ण संघ १७८ धावांवर बाद झाला. कुरनने २२ धावांत ३ बळी घेत पुन्हा एकदा आपली उपयुक्तता सिद्ध केली.

T20 World Cup : इंग्लंडची कशीबशी 'सुपर-८' मध्ये एन्ट्री, इटलीने फोडला घाम; सॅम कुरनमुळे वाचली ब्रिटिशांची लाज
IND vs PAK : मैदानात शत्रुत्व, बाहेर गळ्यात गळे..! पाक खेळाडूची गळाभेट घेणा-या रोहित शर्मावर भारतीय चाहते संतप्त(Video)

सुपर-८ मध्ये प्रवेश, पण धोक्याची घंटा

नेपाळविरुद्धच्या पहिल्या सामन्यातही इंग्लंड अगदी शेवटच्या चेंडूवर विजय मिळवू शकला होता. आता इटलीसारख्या नवख्या संघानेही त्यांना घाम फोडला. सलग तीन विजयांसह इंग्लंडने सुपर-८ मध्ये जागा निश्चित केली असली तरी, त्यांच्या फलंदाजीतील सातत्य आणि गोलंदाजीतील त्रुटी मोठ्या संघांविरुद्ध महाग पडू शकतात.

T20 World Cup : इंग्लंडची कशीबशी 'सुपर-८' मध्ये एन्ट्री, इटलीने फोडला घाम; सॅम कुरनमुळे वाचली ब्रिटिशांची लाज
IND vs PAK Semifinal : भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने येण्याची शक्यता; काय आहे नेमके समीकरण?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news